भारतीय इंजिनिअरच्या मदतीने सापडले विक्रम लँडरचे अवशेष

भारतीय इंजिनिअरच्या मदतीने सापडले विक्रम लँडरचे अवशेष

चेन्नई येथील मॅकेनिकल इंजिनियर ष्णमुग सुब्रह्मण्यम याच्या माहितीने  चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलेल्या विक्रम लँडरच्या अवशेष मिळाल्याचे नासाने स्पष्ट क

‘फॉर समा’- आशावादाचा रक्तरंजित माहितीपट
जामिया मिलिया व अलिगड मुस्लिम विद्यापीठात पोलिसांची दडपशाही
मोदींची जमीन मालकी संशयाच्या भोवऱ्यात

चेन्नई येथील मॅकेनिकल इंजिनियर ष्णमुग सुब्रह्मण्यम याच्या माहितीने  चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलेल्या विक्रम लँडरच्या अवशेष मिळाल्याचे नासाने स्पष्ट केले आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर जिथे कोसळले त्या भागाची अनेक छायाचित्रे नासाने काढली होती पण त्यातून विक्रम लँडर नेमके कुठे कोसळले याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे नासाने अनेक छायाचित्रे इंटरनेटवर प्रसिद्ध केली होती. त्या छायाचित्रांचा अभ्यास करून ष्णमुगने नासाला विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधून दिला.

चंद्रयान-२ मोहीम अयशस्वी होण्यामागे विक्रम लँडरच्या गतीवर नियंत्रण न ठेवता आल्याने ते चंद्राच्या पृष्ठभागानजीक आले असता ते कोसळल्याचे कारण सांगितले गेले होते व लँडर कललेल्या अवस्थेत असल्याने ते छायाचित्र पाठवत नसल्याचे सांगण्यात आले होते. नंतर विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळून त्याचे तुकडे झाल्याचे सांगण्यात आले होते.

नासाच्या ल्युनार रिकॉनिसेन्स ऑर्बिटर कॅमेऱ्याचे रिज्युलेशन हे १.३ एम/पिक्सेल इतके आहे. आणि चंद्रावर सापडलेल्या तीन तुकड्यांचे रिज्युलेशन हे २ पिक्सल तर या तुकड्यांच्या सावलीचे रिज्युलेशन १ पिक्सल इतके होते. या माहितीवरून नासाच्या लक्षात आले की, विक्रम लँडरचा अपघात इस्रायलच्या बेरेशीट या लँडरचा जसा अपघात झाला त्याच प्रकारचा होता. नासाने विक्रमची या संदर्भातील छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. या छायाचित्रांचा अधिक अभ्यास केल्यानंतर विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलेले नाही तर ते कोसळल्याचे स्पष्ट झाले. ष्णमुगने ही छायाचित्रे डाउनलोड करून त्याला आढळलेली अवशेषांची ठिकाणे नासाला कळवली. नासाने त्याच्या माहितीचा अभ्यास करत त्यांना सापडलेले लँडरचे व अवशेषाचे ठिकाण आणि ष्णमुगला सापडलेले ठिकाण हे एकच असल्याबाबत दुजोरा दिला आणि तशी माहिती ष्णमुगला दिली.

हौशी खगोलशास्त्रज्ञांना संधी

नासाकडून अवकाश मोहिमांतील व अन्य प्रकारची अनेक छायाचित्रे सार्वजनिक पातळीवर प्रसिद्ध केली जात असतात. अशाच छायाचित्रांमुळे ष्णमुगच्या चौकस बुद्धीला चालना मिळाली. जे पेशाने खगोल शास्त्रज्ञ नसतात पण ज्यांना खगोलशास्त्राबद्दल माहिती असते त्यांच्या संशोधनाचा, माहितीचाही नासाला फायदा होऊ शकतो हे या निमित्ताने दिसून आले आहे.

या एकूण प्रकरणाबद्दल इस्रो लवकरच आपली प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: