शेहला रशीद यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाची तक्रार

शेहला रशीद यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाची तक्रार

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर मुव्हमेंटच्या नेत्या शेहला रशीद यांनी भारतीय लष्करावर केलेल्या वादग्रस्त टीकेचा दाखला देत त्यांच्याविरोधात  राष्ट्रद्रोहा

पुलवामा ते बालाकोट : प्रपोगंडापलीकडे
प्रत्यक्ष ताबा रेषेवर कायमस्वरुपी सैन्य खर्चिक
राज्यसभा मार्शलच्या नव्या गणवेशाच्या चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर मुव्हमेंटच्या नेत्या शेहला रशीद यांनी भारतीय लष्करावर केलेल्या वादग्रस्त टीकेचा दाखला देत त्यांच्याविरोधात  राष्ट्रद्रोहाची तक्रार सर्वोच्च न्यायालयातील एक वकील अलख अलोक श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलिसांकडे दाखल केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती स्फोटक झाली असून भारतीय लष्कराचे जवान सामान्य नागरिकांवर अत्याचार करत असून ते त्यांच्या घरातही घुसत असल्याचे अनेक ट्विट शेहला रशीद यांनी १७ ऑगस्टला केले होते. शेहला रशीद यांनी भारतीय लष्करावर आरोप करताना असेही म्हटले होते की, भारतीय लष्कराने शोपिआन येथील लष्कराच्या तळावर चार नागरिकांना चौकशीसाठी आणले आणि त्यांचा शारीरिक छळ केला. हा छळ त्या भागातील नागरिकांना ऐकू जाईल अशा पद्धतीने रचला होता. लष्कराने या चारांचे किंचाळणे आसपासच्या परिसरातील लोकांना ऐकू जावे यासाठी त्यांच्यापुढे एक माईक ठेवला होता. जेणेकरून अन्य नागरिकांच्या मनातही दहशत बसावी हा त्यांचा उद्देश होता.

अलख श्रीवास्तव यांनी आपल्या तक्रारीत शेहला रशीद यांनी नागरिकांच्या किंचाळण्याच्या आवाजाचा कोणताही पुरावा जाहीर केलेला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे लष्करावरचे आरोप खोटे, बिनबुडाचे असून त्या मुद्दामून खोट्या बातम्या पसरवत देशात हिंसेला प्रवृत्त वातावरण तयार करत आहेत अशी त्यांची तक्रार आहे. आता या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांकडून केली जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0