शेहला रशीदची निवडणुकांच्या राजकारणातून माघार

शेहला रशीदची निवडणुकांच्या राजकारणातून माघार

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमध्ये गटविकास परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत बुधवारी जम्मू व काश्मीर पीपल्

कोरोना आणि अवनतीकडे जाणारा समाज  
भाजपशी निकटचे संबंध असलेले मनोज सोनी यूपीएससीचे नवे अध्यक्ष
देशोधडी : उपऱ्या विश्वातील निरंतर संघर्षाचे वास्तव कथन

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमध्ये गटविकास परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत बुधवारी जम्मू व काश्मीर पीपल्स पार्टीच्या नेत्या शेहला रशीद यांनी निव़डणुकाच्या राजकारणातून माघार घेतली आहे. केंद्र सरकार देशाच्या कायद्याचा सन्मान ठेवत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून काश्मीरमध्ये मोबाइल –इंटरनेट बंदी आहे, अघोषित संचारबंदी सुरू असून सरकारला कोणतीही लोकशाही प्रक्रिया सुरू करण्याची गरज वाटत नाही. अशा परिस्थितीत निवडणुकांसाठी राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही असे त्यांचे म्हणणे आहे.  केंद्र सरकार जगापुढे काश्मीरमध्ये लोकशाही असल्याचे दावे करत असते पण प्रत्यक्षात खोऱ्यात गेले ६५ दिवस तेथील जनता मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. ही लोकशाही नसून तीचा खून केला गेला आहे, असे रशीद यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

काश्मीरमध्ये गटविकास परिषदेच्या निवडणुका घेतल्या जाणार अशा अटकळी बांधल्या गेल्यानंतर खोऱ्यात सकारात्मक वातावरण निर्माण होत होते. पण सरकारने ऐनवेळी गटविकास परिषदेच्या निवडणुकांवर स्थगिती आणल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शेहला रशीद यांनी निवडणुकांच्या राजकारणातून माघार घेण्यामागे असेही कारण सांगितले की, काश्मीरमधल्या कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेतला तरी स्वत:च्या भूमिकांशी तडजोड करावी लागते. त्यापेक्षा कार्यकर्ता म्हणून काम करणे आपल्याला अधिक श्रेयस्कर वाटते.

माझे यापुढील कार्य एक कार्यकर्ता म्हणून काश्मीरी जनतेच्या हिताचे, हक्कांसाठी राहील. या जनतेला ज्या दडपशाहीचा मुकाबला करावा लागत आहे, त्याच्याविरोधात मी कायम उभे राहीन असे शेहला यांनी म्हटले आहे.

दरम्यान माकपने सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सरकारकडून कायद्याची थट्टा सुरू असल्याची टीका केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0