शीला दीक्षित यांचे निधन

शीला दीक्षित यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. शनिवारी

जेईई, एनईईटी पुढे ढकला; विरोधक ठाम
‘मोदींचे आरोप निवडणुका डोळ्यापुढे ठेवून’
भाजपा-कॉंग्रेस साधर्म्याचं मायाजाल

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. शनिवारी सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्टस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्या बेशुद्धावस्थेत गेल्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शीला दीक्षित काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्या होत्या. त्या दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षही होत्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या त्या निकटच्या होत्या.

दिल्लीचे १९९८ ते २०१३ असे सलग तीन वेळा मुख्यमंत्री पद भूषवण्याचा मान त्यांनी मिळवला होता. त्यांच्या कारकिर्दीत राजधानीचा चेहरामोहरा बदलला. दिल्लीतील रस्त्यांचे जाळे, नागरी सुविधा, मेट्रो या त्यांच्याच काळात तयार झाल्या. पण २०१३मध्ये आम आदमी पक्षाच्या लाटेत त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. २०१४मध्ये त्या केरळच्या राज्यपाल बनल्या पण केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून देशाला आपले आयुष्य समर्पण करणारा काँग्रेसचा एक नेता आपल्यातून निघून गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी दिल्लीच्या विकासात आपले बहुमोल योगदान दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: