शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत

शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत राज्य सरकारने गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत

सरन्यायाधीशपदासाठी रमण्णा यांच्या नावाची शिफारस
साथींचा इतिहास – फ्ल्यू
‘त्या’ तिघांना का सोडले – नवाब मलिक

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत राज्य सरकारने गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला १४ जून २०२१ पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे.

४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क भोजनाचा लाभ

राज्यात १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यानंतर २० मे २०२१ अखेर ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

या योजनेत आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्रे सुरू आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: