सत्तेसाठी युतीमध्ये कलगीतुरा

सत्तेसाठी युतीमध्ये कलगीतुरा

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा मिकाल आल्यापासून, जास्त जागा मिळविणाऱ्या शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्ता स्थापन करण्यावरून जे आरोप-प्रत्यारोप, दावे-प्

मॉन्सूनचा उतारा
ईडीकडून चिदंबरम यांना अटक
अर्णबवरील फिर्याद रद्द करण्यास नकार

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा मिकाल आल्यापासून, जास्त जागा मिळविणाऱ्या शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्ता स्थापन करण्यावरून जे आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरु होते, त्यांनी काल वरची पातळी गाठली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५० टक्के सत्ता राबविण्याची कोणतीही बोलणी झाली नसल्याचे आणि मुख्यमंत्री पदाबाबत आकाहीही ठरले नसल्याचे सांगितले. त्यावर शिवसेनेचे संजय राऊत यांनी मग सत्याला काही अर्थ उरत नसल्याचे सांगत शिवसेना आणि भाजपाची नियोजित बैठक रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल. ते म्हणाले, “त्यांना ५ वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावे, असे वाटू शकते. पण वाटणे आणि होणे यात फरक आहे. १९९५ चा फॉर्म्युला होईल की नाही याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणती खाती द्यायची हे चर्चेला बसल्यावर कळेल. “

उध्दव ठाकरेंचे आणि माझे निवडणूक निकालानंतर फोनवर बोलणे झाले. आम्ही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, असेही फडणवीस यांनी सांगितले.

“सामनामध्ये ज्या पध्दतीने लिहिले जात आहे, त्यावर आम्ही खूश नाही. आमची नाराजी आहेच. कॉंग्रेस-राष्ट्रवादी जे म्हणत नाही, ते सामनामध्ये शिवसेना म्हणते. वृत्तपत्र म्हणून ते भूमिका घेतात, पण लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. इतक्या ताकदीने कॉंग्रेस – राष्ट्रवादीवर पण लिहून दाखवा,” असे आव्हान फडणवीसांनी शिवसनेला दिले.

यानंतर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, “आमची समजूत काढण्याची गरज नाही. आम्ही हट्टाला पेटलेलो नाहीये. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर फणा काढून बोलण्याची गरज नाही. मी फणा काढून बोलत नाहीये. मी पक्षाची भूमिका मांडतोय. सामनासुद्धा तेच करतोय. ज्या मागण्या मान्य केल्या होत्या, त्या तेवढंच तर मागतोय.” त्यानंतर जागा वाटपासंदर्भात शिवसेना – भाजपची होणारी पहिली बैठक रद्द झाल्याचे राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेचे निवडून आलेले ४५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपचे खासदार संजय काकडे यांनी म्हंटले आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रवादीत अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ या नेत्यांना मानणारे गट आहेत, तसेच शिवसेनेतदेखील गट आहेत. याच गटांचे नेते काहीही करून आम्हाला सत्तेत घ्या, अशी मागणी करीत असल्याचे काकडे यांनी म्हंटले. ते म्हणाले, “१९९५ साली भाजपाचे ६३ आणि सेनेचे ७८ आमदार निवडून आले होते. तेव्हा पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होता आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तेच सूत्र आता लागू होईल.”

‘आम्हाला इतर पर्याय खुले आहेत असे म्हणणे, ही सेनेची घोडचूक ठरू शकते, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  ते म्हणाले, “शिवसेनेचे हे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे.” जसे त्यांना इतर पर्याय खुले आहेत, तसे आम्हालाही आहेत. पण ‘रघुकुल रीत सदा चली आयी’, असे म्हणत आपण महायुती केली असेल, तर महायुतीसोबतच राहणे अपेक्षित आहे,  असे मुनगंटीवार म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: