राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेस आमंत्रण देऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी

जेलमध्येच आसारामचा महिमा सांगणारा कार्यक्रम
कफील खान यांच्या सुटकेचे सुप्रीम कोर्टाकडून समर्थन
मुझफ्फरनगर दंगलः भाजप नेत्यांवरचे खटले रद्द

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेस आमंत्रण देऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांचा शपथविधी केल्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

राज्यपालांनी सापत्नभावाची वागणूक दिली असा या तिन्ही पक्षांचा आरोप असून राज्यपाल म्हणून कोश्यारी यांनी राज्यघटनेची प्रतिष्ठा कमी केली व भाजपचे प्यादे म्हणून काम केले असा आरोप शिवसेनेने या याचिकेत करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस या तिघांकडे किमान १४५ आमदारांचे पाठबळ आहे. आमचे सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना भाजपला सत्तास्थापनेसाठी पाचारण करणे हे घटनाबाह्य व बेकायदा असून राज्यविधिमंडळाचे विशेष अधिवेशन २४ नोव्हेंबरला घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत अशीही या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका शनिवारी रात्री त्वरित सुनावणीस घ्यावी अशीही या तीन पक्षांनी विनंती केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0