टोकियो पॅराऑलिम्पिकः अवनी, सुमीतला सुवर्णपदक

टोकियो पॅराऑलिम्पिकः अवनी, सुमीतला सुवर्णपदक

टोकियो/नवी दिल्लीः टोकियोत सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताने सोमवारी नेत्रदीपक यश मिळवले. सुमीत अंतलने भाला फेकमध्ये विश्व विक्रमासह सुवर्ण पदक

कामगार हक्कांसाठी बीएमएसचे २०मे रोजी आंदोलन
मनसेचा ‘राज’मार्ग : नवा झेंडा, नवा अजेंडा
‘बार्क’चा रिपब्लिकवर आरोप

टोकियो/नवी दिल्लीः टोकियोत सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताने सोमवारी नेत्रदीपक यश मिळवले. सुमीत अंतलने भाला फेकमध्ये विश्व विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले तर नेमबाजीत अवनी लेखराने सुवर्ण पदक पटकावले. सुमीत अंतलने आपल्या पाचव्या प्रयत्नात ६८.५५ मीटर अंतरावर भाला फेकला, जो विश्व विक्रम ठरला. तर अवनीने २१० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली. तिने २४९.६ गुण मिळवून विश्व विक्रमाची बरोबर केली आहे.

२३ वर्षांचा सुमीत हरियाणाचा असून २०१५मध्ये एका मोटार सायकल अपघातात त्याचा डावा पाय निकामी झाला होता.

१९ वर्षांची अवनी जयपूर येथील रहिवासी असून २०१२मध्ये एका मोटार अपघातात तिचा पाठीचा कणा निकामी झाला होता. भारतातर्फे पॅरा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पहिले सुवर्ण पदक मिळवणारी म्हणून अवनीचे नाव कोरले गेले.

अवनीच्या आधी मुरलीकांत पेटकर (पुरुष जलतरण,१९७२), देवेंद्र झाझरिया (पुरुष भाला फेक, २००४,२०१६) व मरियप्पन थंगावेलू (पुरुष उंच उडी, २०१६) यांनी सुवर्ण पदक मिळवले होते.

आपल्या कामगिरीबद्दल प्रतिक्रिया देताना अवनीने आपण पदकापेक्षा खेळावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले असे सांगितले. अवनीने या आधी २०१९च्या विश्व चषक स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते. तिचे हे पहिलेच पॅरा ऑलिम्पिक असून पात्रता व अंतिम फेरीत तिने लागोपाठ १०च्या वर गुण मिळवले आहेत. ती जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.

सुमीतने त्याच्या प्रशिक्षणादरम्यान ७१ मीटर व ७२ मीटर भाला फेकला होता. अपघात होण्याआधी सुमीत पैलवान होता. एका अपघातात त्यांना डाव पाय गमवावा लागला. त्याने आपला सराव कृत्रिम पाय बसवून सुरू केला. पहिल्यांदा त्याला बराच रक्तस्रावाच्या त्रासाला सामोरे जावे लागले. पण त्याने जिद्द कायम ठेवली. सुमीतने २०१९मध्ये दुबई विश्वचषक स्पर्धेत एफ-६४ भाला फेक गटात रौप्य पदक मिळवले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: