चौकशी समितीत नसायला हवं होतः गोगोई

चौकशी समितीत नसायला हवं होतः गोगोई

नवी दिल्लीः बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देणारे माजी सरन्यायाधीश व राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी बुधवारी वेगळी कबुली दिली. सरन्यायाधीश असताना गोगोई

सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक घेणे नाकारले
देश कठीण परिस्थितीतून जातोय – सरन्यायाधीश
आंबेडकरांना राष्ट्रीय भाषा संस्कृत हवी होतीः बोबडे

नवी दिल्लीः बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देणारे माजी सरन्यायाधीश व राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी बुधवारी वेगळी कबुली दिली. सरन्यायाधीश असताना गोगोई यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी गोगोई यांनीच स्वतःच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती व स्वतःला निर्दोष मुक्त केले होते. या समितीवर आपण असायला नको होते, अशी कबुली त्यांनी बुधवारी दिली. आपण आयुष्यात चुका करतो या चुका स्वीकारण्यात काहीच वाईट नसते असे विधान त्यांनी केले.

गोगोई सरन्यायाधीश असताना त्यांच्यावर सत्तेच्या फायद्याचे निर्णय दिल्याची टीका झाली होती. या सर्वांची उत्तरे देणारे एक आत्मचरित्र ‘जस्टिस फॉर द जज’ रंजन गोगोई यांनी लिहिले असून या पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात गोगोई यांनी त्यांच्या हातून वादग्रस्त ठरलेल्या अनेक निर्णयांवर आपली बाजू मांडली.

ते म्हणाले, माझ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले व त्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती. या प्रकरणाची चौकशी समिती नेमण्यात आली त्यात आपणही सामील होतो. त्याचे कारण आयुष्यातील ४५ वर्षे खर्च करून मेहनतीने प्रतिष्ठा मिळवली होती. ही प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून चौकशी पीठावर सामील झालो. पण आता या पीठाचे सदस्यत्व घ्यायला नको होते, ते योग्य ठरले असते. आपण सगळेच जण चुका करतो, त्याचा स्वीकार करण्यात काहीच वावगे नाही, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, माझ्यानंतर न्या. शरद बोबडे सरन्यायाधीश होणार होते. ते स्वतः चौकशी समितीत होते. त्यांना व्यक्तिगत लाभ घेता आला असता व मला दोषी ठरवता आले असते. तसे झाले असते तर बोबडेंना सात महिने अधिक कार्यकाळ मिळाला असता. पण बोबडेंनी तक्रारदार महिलेच्या अर्जात काहीच दम नसल्याचा निर्वाळा दिला होता. माझ्याच कार्यकाळात तक्रारदार महिलेला नोकरीत पुन्हा रुजू करून घेण्यात आले, याकडे गोगोई यांनी लक्ष वेधले. मीच या महिलेला मानवतेच्या दृष्टिकोनातून नोकरीवर परत घ्यावे असे पत्र लिहिले. त्या पत्राची दखल घेत बोबडेंनी महिला व अन्य दोन कर्मचार्यांना नोकरीवर पुन्हा रुजू करून घेतले, असे गोगोई यांनी सांगितले.

अयोध्या प्रकरणाचा निकाल व राज्यसभेची खासदारकी

गोगोई यांनी अयोध्येचा निकाल देशातील हिंदुत्ववादी संघटनांना व सत्ताधारी भाजपच्या हिताचा दिला अशी टीका झाली होती. गोगोई यांनी राफेल विमान खरेदी घोटाळा, सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांचे बरखास्तीचे प्रकरण, अशा महत्त्वाच्या विषयात सत्ताधार्यांच्या बाजूचा निकाल दिल्याने त्यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी दिली असाही थेट आरोप झाला होता. हा आरोप गोगोई यांनी फेटाळून लावला.

ते म्हणाले, अशा आरोपामुळे मला काही फरक पडत नाही. मला अयोध्या प्रकरणातील निकालामुळे राज्यसभा मिळाली असा मीडियाचा व वर्तमानपत्रांचा समज आहे. अयोध्या प्रकरण एक जबाबदारी होती. माझ्यापुढे पळून जाणे किंवा लढणे असे दोनच पर्याय होते. मी लढाई लढली. मी योद्धांच्या कुटुंबियातून आलो आहे, त्यामुळे मी लढलो, असे गोगोई म्हणाले.

गोगोई यांनी आपण सरन्यायाधीशपदी असताना पंतप्रधानांची एकदाही भेट घेतली नाही. पण आता पंतप्रधानांसोबत सेल्फी घेणारे न्यायाधीश झाले असे विधान केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: