सिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक

सिक्कीममध्ये भारत-चीन सैन्यात चकमक

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर त्यांचा मुकाबला करताना २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर २० जानेवारीला सिक्कीमच्या उत्तर

नुपूर शर्मा प्रकरण : ‘टाइम्स नाऊ’च्या नाविका कुमारविरोधात एफआयआर
जी२० देशांना औष्णिक वीजनिर्मितीसाठी सवलती
सर्व्हे अचूक असेल तर कोरोनाची रुग्ण संख्या १४-१५ कोटी

नवी दिल्लीः गेल्या वर्षी लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर त्यांचा मुकाबला करताना २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर २० जानेवारीला सिक्कीमच्या उत्तरेकडील नाकू ला भागात भारत व चीनच्या सैनिकांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन्ही देशांचे काही सैनिक जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्यांनी लगेचच प्रोटोकॉलनुसार या मुद्द्यावर आपापल्या सैनिकांना रोखले व शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण ही घटना मामूली होती असे सांगण्यात आले. सोमवारी भारताने या घटनेची माहिती दिली.

गेल्या वर्षी ९ मे रोजी याच नाकू ला भागात चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली होती. २० जानेवारीच्या घटनेत नाकू ला येथील प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून चीनचे काही सैनिक भारताच्या हद्दीत घुसले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी केल्यानंतर वादावादी होऊन त्यात झडप झाली.  त्यात दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले. भारतीय लष्कराने ही घटना प्रसार माध्यमांकडून अतिरंजित केली जाऊ नये अशी विनंती केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: