सिंगापूरमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’वर बंदी

सिंगापूरमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’वर बंदी

सिंगापूरः ९० च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून हिंदूंचे झालेल्या पलायनावर आधारित हिंदी चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’वर सिंगापूर सरकारने बंदी घातली आहे. या चित

रंग रंग रंगीला रे…
‘वेलकम होम’ : प्लेस आणि स्पेसचा विचार
राज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार

सिंगापूरः ९० च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून हिंदूंचे झालेल्या पलायनावर आधारित हिंदी चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’वर सिंगापूर सरकारने बंदी घातली आहे. या चित्रपटातून दोन धर्मांमध्ये तेढ, विखार व शत्रूत्व उत्पन्न होण्याची भीती असून सिंगापूर फिल्म सर्टिफिकेशनच्या मार्गदर्शक तत्वात ‘द काश्मीर फाइल्स’ बसत नसल्याचे स्पष्टीकरण सिंगापूरने दिले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये मुस्लिमांविरोधात एकतर्फी चित्रण असून काश्मीरमध्ये जे संकट आले त्यात केवळ हिंदूंनाच त्रास झाला असे दाखवण्यात आले ते आपल्याला मान्य नसल्याने हा चित्रपट सिंगापूरमध्ये प्रसिद्ध केला जाणार नाही असे सिंगापूर सरकारने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

‘द काश्मीर फाइल्स’मध्ये विभिन्न धार्मिक समुदायांमध्ये शत्रूत्व निर्माण होईल असे चित्रिकरण असून आमच्या देशात विविध धर्माचे व वंशाचे लोक राहतात. या विविध धार्मिक समुहांमधील सामाजिक एकता व धार्मिक सौहार्द आम्हाला बिघडवायचे नाही, सिंगापूरच्या चित्रपट कायद्यानुसार या चित्रपटाच्या प्रसारणास आम्ही बंदी घालत असल्याचे सिंगापूरच्या सरकारने म्हटले आहे.

भारतात ११ मार्चला ‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने देशात पुन्हा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण सुरू झाले. या ध्रुवीकरणाचा एक भाग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले. त्यांनी हा चित्रपटाची स्तुती करत प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा असे आवाहन केले. भाजपच्या अनेक मंत्री, नेत्यांनीही ‘द काश्मीर फाइल्स’ची वारेमाप स्तुती करत त्याचे मोफत खेळही दाखवण्यास सुरूवात केली. भाजपशासित राज्यांनी हा चित्रपट त्यांच्या राज्यात करमुक्त केला. काही राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्यास सुटीही दिली. चित्रपटाच्या सोशल मीडियावरील तुफान प्रमोशनमुळेही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील हिंदू-मुस्लिम यांच्यातील विपर्यास संबंधांवर विरोधी पक्षांनी भाजपवर निशाणा साधला. यातून राजकारण तापले. त्यानंतर सरकारने या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सीआरपीएफची वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्थाही मंजूर केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0