लॉकडाऊनमध्ये महिला अत्याचाराचा खोटा प्रचार – स्मृती ईराणी

लॉकडाऊनमध्ये महिला अत्याचाराचा खोटा प्रचार – स्मृती ईराणी

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात देशात महिलांवर घरगुती हिंसाचार, अत्याचाराची टक्केवारी वाढून तशा अनेक तक्रारी आपल्याकडे आल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे

बार परवान्यावरून स्मृती इराणी यांची काँग्रेस पक्ष व नेत्यांना नोटीस
स्मृती इराणी गोत्यात; मुलगी-पतीच्या नावेच खाद्य परवाना
जोइशा इराणीसंदर्भातील ट्विट हटवा; न्यायालयाचे काँग्रेस नेत्यांना आदेश

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात देशात महिलांवर घरगुती हिंसाचार, अत्याचाराची टक्केवारी वाढून तशा अनेक तक्रारी आपल्याकडे आल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे म्हणणे असताना केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी मात्र लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.

महिला सबलीकरणावर काम करणार्या देशातल्या काही एनजीओ लॉकडाऊनमध्ये महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची आकडेवारी फुगवून सांगतात, असे ईराणी यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या, प्रत्येक राज्यात महिला अत्याचार रोखण्याठी स्टॉप क्रायसेस सेंटर आहे व ते अत्यंत सक्षमपणे काम करत आहे. आम्ही अशा अनेक महिलांना वेळीच सुरक्षित केले असून त्या महिलांची नावे, माहिती उघड करणे उचित नाही. पण सर्व राज्यांची व जिल्ह्यातील पीडित महिलांचे केलेल्या पुनर्वसनाविषयी माहिती उपलब्ध आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात राहणार्या ८० टक्के महिलांवर शारीरिक अत्याचार केला जात आहे, अशी भीती काही एनजीओशी संलग्न असलेल्या मंडळींकडून पसरवली जात आहेत. ती पूर्णतः निराधार असून देशातला प्रत्येक पुरुष आपल्या घरातल्या महिलेला मारहाण करत आहे, असेही दिसत नाही. या पूर्ण लॉकडाऊनमध्ये पोलिस अत्यंत सक्षमपणे काम करत असून महिला अत्याचार प्रतिबंधक केंद्र काम करत असल्याचा दावा ईराणी यांनी केला. सरकारने केवळ अत्याचारपीडित महिलांचेच नव्हे तर मुलांचेही पुनर्वसन केले असून सर्व राज्यांमध्ये हेल्पलाइन व मुख्य केंद्रीय क्रमांक सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.

ईराणी यांचा हा दावा या पार्श्वभूमीवर आला आहे की, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी लॉकडाऊनच्या काळात ई-मेलद्वारे अनेक तक्रारी आल्याचे सांगितले होते. त्या म्हणाल्या, मार्चच्या पहिल्या आठवड्यात महिला आयोगाकडे ११६ तक्रारी आल्या. त्यानंतर लॉकडाऊनच्या २३ ते ३१ मार्चच्या काळात या तक्रारींची संख्या २५७ इतकी झाली. नंतर एप्रिल महिन्यात हा आकडा ३१५ इतका वाढला. या तक्रारीमध्ये एक तक्रार मुलीवर लग्नाचा दबाव आणणारी होती, तर एक तक्रार सासू-सासर्यांकडून मुलीला होणारी मारहाणीसंदर्भात मुलीच्या बहिणीने केली होती.

महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यातील ३१५ तक्रारी या ऑनलाइन व व्हॉट्सअपवरून आल्या होत्या. त्या या काळात पत्राद्वारे आल्या नव्हत्या. ही आकडेवारी गेल्या ऑगस्टपेक्षा अधिक आहे.

महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन पुकारल्यानंतर महिलांवर अत्याचार वाढत असल्याची चिंता संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटानियो गुतारेस यांनी व्यक्त करून प्रत्येक देशाच्या सरकारना हा विषय गंभीरपणे घेण्याचे व अशा तक्रारींचा निपटारा करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

मूळ बातमी  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0