पिगॅसस स्पायवेअर वापरुन भारतीय पत्रकारांवर पाळत

पिगॅसस स्पायवेअर वापरुन भारतीय पत्रकारांवर पाळत

इस्रायलच्या ‘एनएसओ’ ग्रुपच्या पिगॅसस स्पायवेअर वापरुन स्वतंत्र पत्रकार, स्तंभलेखक, भाषिक माध्यमे यांसह हिंदुस्तान टाईम्स, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, द वायर, न्यूज-18, इंडिया टूडे, द पयोनियर यांच्यासारख्या राष्ट्रीय माध्यमांवर पाळत ठेऊन लक्ष्य करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ‘द वायर’सह १६ माध्यम संस्थांनी केलेल्या केलेल्या पडताळणीत हे उघड झाले आहे.

स्वातंत्र्य, समता, मानवतेचे गीत गाणारा द्रष्टा
नवीन विज्ञान तंत्रज्ञान धोरण (मसुदा) समजून घेताना …
सरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव

नवी दिल्ली –इस्रायली कंपनीच्या विविध सरकारी ग्राहकांनी पाळत ठेवण्यासाठी वापरलेल्या जगभरातील हजारो फोन नंबरच्या रेकॉर्डच्या द वायर आणि सहकारी माध्यम संस्थांनी केलेल्या पडताळणीत हे उघड झाले आहे, की २०१७ आणि २०१९ दरम्यान एका अज्ञात भारतीय एजन्सीने पाळत ठेवण्यासाठी ४० भारतीय पत्रकारांची निवड केली होती.

उघड झालेल्या माहितीनुसार हे स्पष्ट होत आहे, की हिंदुस्तान टाइम्सचे संपादक शिशिर गुप्ता यांच्यासह इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस यांसारख्या भारतातील मोठ्या माध्यम संस्थांचे पत्रकार हॅकिंगसाठी निशाण्यावर होते.

यांमध्ये द वायरच्या दोन संस्थापक संपादकांसह तीन पत्रकार, दोन नियमीत लेखकांची नावे आहेत. यामध्ये रोहिणी सिंग यांचे नाव आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या उद्योगाविषयी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे व्यावसायिक निखिल मर्चेंट आणि बडे प्रस्थ असणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उद्योगपती अजय पिरामल यांच्याबरोबर झालेल्या व्यवहारांच्या बातम्या दिल्यानंतर रोहिणी सिंग यांना टार्गेट करण्यात आले होते.

इंडियन एक्सप्रेसमध्ये सह संपादक असणारे एक अन्य पत्रकार सुशांत सिंग यांच्यवरी लक्ष ठेवण्यात आले होते. ते २०१८ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या राफेल व्यवहारांची तपासणी करीत होते.

दिल्लीतील पत्रकारांवर नज़र

लिस्टमध्ये सामील असणारे बहुतांशी पत्रकार राजधानी दिल्लीतील असून, मोठ्या संस्थांशी संबंधीत आहेत. ज्यामध्ये हिंदुस्तान टाइम्स समूहातील सध्याच्या चार आणि एका माजी पत्रकारावर पिगॅससच्या भारतातील ग्राहकाने नजर ठेवली होती.

यामध्ये कार्यकारी संपादक शिशिर गुप्ता, संपादकीय पानाचे संपादक आणि माजी ब्यूरो चीफ प्रशांत झा, संरक्षण क्षेत्रात बातमीदारी करणारे राहुल सिंग, कॉँग्रेस कव्हर करणारे माजी राजकीय बातमीदार औरंगजेब नक्शबंदी आणि याच समूहाचे वृत्तपत्र ‘मिंट’च्या एका बातमीदाराचा समावेश आहे.

अन्य प्रमुख माध्यम संस्थांमध्ये काम करणाऱ्या कमीत कमी एका तरी बातमीदाराचा फोन नंबर या लिस्टमध्ये दिसून येत आहे.  यामध्ये इंडियन एक्सप्रेसच्या ऋतिका चोप्रा (ज्या शिक्षण आणि निवडणूक आयोगायची बातमीदारी करतात) इंडिया टुडेचे संदीप उन्नीथन (जे संरक्षण आणि लष्करासंबंधी बातमीदारी करतात), टीवी 18 चे मनोज गुप्ता (जे शोध पत्रकारीता आणि संरक्षण संबंधांचे संपादक आहेत), द हिंदूच्या विजेता सिंग (ज्या गृह मंत्रालयांची बातमीदारी करतात) यांचा समावेश आहे. यांच्या फोनवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रयत्नांचे पुरावे मिळाले आहेत.

सिद्धार्थ वरदराजन, स्वाती चतुर्वेदी, रोहिणी सिंह, एमके वेणु. (सर्व फोटो: द वायर)

सिद्धार्थ वरदराजन, स्वाती चतुर्वेदी, रोहिणी सिंह, एमके वेणु. (सर्व फोटो: द वायर)

द वायरचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन आणि एमके वेणु यांचे फोन निशाण्यावर होते, हे फॉरेन्सिक संशोधनात आढळून आले आहे. द वायरचे राजनायीक संपादक देवीरूपा मित्रा यांनाही टार्गेट करण्यात आले होते.

रोहिणी सिंग यांच्याशिवाय द वायरसाठी नियमितपणे राजकारण आणि संरक्षण संबंधी लेखन करणारे ज्येष्ठ पत्रकार प्रेमशंकर झा यांच्याही फोनवर तसेच स्वतंत्र पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनाही टार्गेट करण्यात आले होते.

हेरन आणि त्यांचे वृत्तपत्र (फोटो: पावनजोत कौर)

हेरन आणि त्यांचे वृत्तपत्र (फोटो: पावनजोत कौर)

 

 

 

 

दिल्लीपासून दूर

ल्युटेन्स दिल्लीच्या आणि राष्ट्रीय चकचकीत दुनियेपासून दूर असणाऱ्या भगत काम करणाऱ्या पत्रकारांची नावेही यात सामील आहेत. यामध्ये उत्तर-पूर्व भागात फ्रंटियर टीव्हीमध्ये मुख्य संपादिका असणाऱ्या मनोरंजना गुप्ता, बिहारचे संजय श्याम आणि जसपाल सिंह हेरन यांची नावे आहेत.

हेरन लुधियाना येथील पंजाबी दैनिक ‘रोज़ाना पहरेदार’चे मुख्य संपादक आहेत. पंजाबच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे पत्रकार आहेत. हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आणि त्याचा राज्यात प्रभाव आहे, असे वृत्तपत्र आहे.

हेरन यांनी ‘पिगॅसस प्रोजेक्ट’ला सांगितले की त्यांच्या वृत्तपत्रात येणाऱ्या टिकात्मक बातम्यांमुळे अनेक वर्षांपासून सगळ्या सरकारांबरोबर त्यांचा संघर्ष झाला आहे. त्यांना अनेक कायदेशीर नोटिसा मिळाल्या आहेत. ते म्हणाले, की पत्रकारांवर कोणत्याही प्रकारची पाळत ठेवणे लज्जास्पद आहे. ते म्हणाले, “त्यांच्या नेतृत्त्वाखाली देश ज्या दिशेने चालला आहे, त्यावर आम्ही टीका केलेली त्यांना आवडत नाही. आम्हाला गप्प बसवण्याकहा हा प्रयत्न आहे.”

लुधियानापासून दक्षिण-पूर्व भागामध्ये १५०० किलोमीटर दूर एक पत्रकार भेटले. जे खूप मोठे वाटत नसले तरी एनएसओ ग्रुपच्या भारतीय ग्राहकाची त्यांच्यावर खास नजर होती. झारखंडच्या रामगड मधील के. रूपेश कुमार सिंग स्वतंत्र पत्रकार आहेत आणि त्यांच्याशी संबंधीत तीन फोन नंबरवर नजर ठेवली जात असल्याचे पुढे आले आहे.

रूपेश यांना हे समजल्यावर त्यांना आश्चर्य वाटले नाही. ते म्हणाले, “मला नेहमी असे वाटायचे की माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. विशेष करून २०१७ मध्ये एका निर्दोष आदिवासीची हत्या झाली, त्या संदर्भातील बातम्या केल्यापासून तर मला हे वाटतच होते.”

रूपेश ज्या बातमी बद्दल बोलत आहेत, ती १५ जून २०१७ मध्ये ‘द वायर हिंदी’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ज्यामध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याला राज्य पोलिसांनी बंदी असलेल्या माओवाद्यांशी संबंधीत असल्याकहा दावा केला होता.

‘पिगॅसस प्रोजेक्ट’ला मिळालेल्या माहितीनुसार हे वृत्त आल्यानंतर काही महिन्यातच रुपेश यांच्या फोनवर पाळत ठेवण्यास सुरुवात झाली होती. जून २०१९ मध्ये बिहार पोलिसांनी रुपेश यांना अटक केली आणि त्यांच्यावर ‘यूएपीए’अंतर्गत स्फोटके ठेवल्याची केस दाखल केली. ६ महिन्यांनंतर त्यांना जमीन मिळाला. कारण वेळेमध्ये त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना अपयश आले. रुपेश सिंग म्हणाले, “पोलिसांनी स्फोटके लावली होती. माझ्या पत्रकारीतेमुळे मला घाबरवण्याचा हा प्रयत्न होता.

पाळत ठेवण्यात आलेल्या पत्रकारांच्या यादीमध्ये ‘द पायोनियर’चे शोध पत्रकार जे. गोपीकृष्णन यांचेही नाव आहे. त्यांनी 2 जी टेलीकॉम घोटाळ्याच्या बातम्या केल्या होत्या त्यांनी ‘द वायर’ला सांगितले, “एक पत्रकार म्हणून मी अनेक लोकांच्या संपर्कात असतो आणि असेही काही लोक आहेत, ज्यांना मी कोणाच्या संपर्कात आहे, याची माहिती हवी असते.”

अनेक असे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांनी मुख्य धारेतील वृत्तपत्र संस्था सोडल्या आहेत, त्यांचीही नावे या यादीमध्ये आहेत. यामध्ये संरक्षण विषयक बातम्या करणारे माजी पत्रकार सैकत दत्ता, ‘ईपीडब्ल्यू’चे माजी संपादक आणि आता न्यूज़क्लिक वेबसाइटसाठी नियमितपणे लिहिणारे परंजॉय गुहा ठाकुरता,  टीव्ही -18 ची पूर्वीची अॅंकर आणि ‘द ट्रिब्यून’ची राजनायिक बातमीदार स्मिता शर्मा, आउटलुकचे माजी पत्रकार एसएनएम अब्दी आणि डीएनएचे माजी बातमीदार इफ्तिखार गिलानी यांची नवे सामील आहेत.

‘द वायर’द्वारे केलेल्या माहितीच्या विश्लेषणात असे पुढे आले आहे, की या वृत्तामध्ये उल्लेख करण्यात आलेली बहुतांशी नावे ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी २०१८-२०१९च्या दरम्यान टार्गेट करण्यात आली.

 

(हे वृत्त अपडेट होत आहे)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0