प्रा. पुष्पा भावे यांचे निधन

प्रा. पुष्पा भावे यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या, सामाजिक चळवळीच्या आधारस्तंभ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे शनिवारी ररात्री दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.

लक्ष्मीकांत देशमुख भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष
जयंत गेल्यानंतर ‘अधांतरा’त ‘काय डेंजर वारा सुटलाय’
एनएसएसच्या सर्वेक्षणातून दिसत आहे शेतकऱ्यांची स्थिती

ज्येष्ठ समाजवादी नेत्या, सामाजिक चळवळीच्या आधारस्तंभ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.

मुबईतील रुईया महाविद्यालयात प्राध्यापिका आणि मराठी विभागाच्या प्रमुख असणाऱ्या पुष्पा भावे राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढल्या होत्या. पुरोगामी विचारवंत आणि चळवळींमध्ये अग्रभागी असणाऱ्या पुष्पा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, दलित पँथर, देवदासी मुक्ती अशा चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि दबलेल्या वर्गाचा आवाज म्हणून भावे शेवटपर्यंत काम करीत होत्या.

लोकशाही आणि समतेच्या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या पुष्पा भावे यांनी आपल्या पुरोगामी वैचारिक भूमिकेला कृतीची जोड दिली होती. गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला.

अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्याबरोबर लाटणे मोर्चा महागाईविरोधी आंदोलनांसारख्या जन आंदोलनांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार चळवळ, कामगारांना घरांसाठी, स्त्रीवादी चळवळीमध्ये त्या अग्रभागी होत्या. दलित चळवळ आणि विशेषतः दलित स्त्रियांच्या चळवळीसाठी त्यांनी संघटनाचे काम केले. अंदाश्रद्धा निर्मूलन समिती, असंघटित कामगार चळवळ, हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्यांनी योगदान दिले. सामाजिक कृतज्ञता निधीतही त्यांनी मोठा सहभाग दिला.

आणीबाणीच्या नंतर तयार झालेल्या जनता पक्षाचे त्यांनी काम केले. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा मोठ्या आंदोलनांमध्ये त्या नेत्या म्हणून पुढे होत्या.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये प्रा. पुष्पा भावे पदाधिकारी होत्या.

मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी केलेली नाटकांची समीक्षा गाजली होती. ‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा पुष्पाताईंनी मराठी अनुवाद केला आहे.

२०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठास दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास त्यांनी विरोध केला होता. तसेच राज ठाकरे यांच्यावर रमेश किणींच्या मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यावर त्या ठामपणे ठाकरे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या.

त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: