सामाजिक एकजूटीचे सनदी सेवेतील मुस्लिम अधिकाऱ्यांचे आवाहन

सामाजिक एकजूटीचे सनदी सेवेतील मुस्लिम अधिकाऱ्यांचे आवाहन

कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग केवळ भारत नव्हे तर जग आणि मानवजातीपुढे मोठे संकट आहे, आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतातील मुसलमान समाज हा कोरोनाला परतावून लावण्यासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंग व या महासाथीला रोखणार्या उपायांचे कसोशीने पालन करत नसल्याचे संदेश पसरवले जात आहेत. काही असेही व्हीडिओ सोशल मीडियातून पसरले आहेत की ज्यात मुस्लिम समाजातील काही व्यक्ती आरोग्य सेवकांवर थुंकत आहेत, त्यांच्यावर दगडफेक करत आहे तसेच पोलिसांविरोधात संघर्षाच्या तयारीत आहेत. काही व्हीडिओमध्ये मशिदीत नमाज करत असताना पोलिस लाठीमार करत असल्याचे दिसत आहे.

४ एप्रिल २०२०मध्ये एका राष्ट्रीय दैनिकाने एक वृत्त प्रसिद्ध केले, त्यामध्ये मार्चमध्ये देशात कोरोना विषाणूमुळे जेवढे रुग्ण बाधित झाले त्यातील २५ टक्के रुग्ण हे दिल्लीत झालेल्या तबलिग जमातच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्यांमुळे पसरले आहेत, असे म्हटले आहे.
अशा अत्यंत कठीण प्रसंगी भारताच्या विविध सनदी सेवांमध्ये कार्यरत असलेले आम्ही अधिकारी वर्ग, मुस्लिम समुदायाला असे आवाहन करत आहोत की, या कठीण प्रसंगात या समाजातील प्रत्येक घटकाने, नागरिकाने अत्यंत जबाबदारीने, काळजीपूर्वक आपल्या वर्तनातून कोरोना विषाणूच्याविरोधात पुकारलेल्या सामूहिक लढाईत देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या सोबत असल्याचा एक आदर्शपाठ आखून द्यावा. असे वर्तन केल्याने केवळ मुसलमानांकडून कोरोना संसर्ग देशभर पसरला, या आरोपाला संधीही देऊ नये.

इस्लामी शरियानुसार स्वतःला विषाणूची बाधा होणे हा सुद्धा एक अधर्म आहे. आत्महत्या व बेजबाबदारपणामुळे निर्माण होणारे आजार हे इस्लाममध्ये हराम समजले जातात. कोरोना विषाणू हा एकाच व्यक्तीच्या शरीरात राहात नाही तर तो संक्रमित होऊन अन्य व्यक्तीला त्याची लागण होते आणि पर्यायाने अनेक कुटुंबे व समाजामध्ये तो फैलावला जाऊ शकतो, त्यातून निष्पापांच्या जीवावर बेतले जाऊ शकते.
कुराण असे सांगते की, एखाद्या निर्दोषाला मारणे म्हणजे संपूर्ण मानवजातीला मारण्यासारखे असते तर एक जरी जीव वाचवला तरी मानवजातीला जगवल्यासारखे असते. प्रेषित पैगंबर यांच्या अनेक वचनात व हदीसमध्ये महासाथीतून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक पावले उचलण्यास सांगितली आहेत.

सध्याच्या घडीला सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ जे सांगत आहेत, त्यांच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजचे आहे आणि त्यांच्या सूचना धर्मशास्त्राच्या चौकटीत जरी बसत नसल्यातरी त्यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी धर्मात विलगीकरणाची मंजुरी नसली तरी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एक सुरक्षित उपाय म्हणून प्रत्येकाने विलगीकरण सूचनेचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

एकदा कोराना साथीचे आव्हान परतावून लावल्यानंतर व जनजीवन सामान्य झाल्यानंतर मुसलमान पुन्हा नमाज करू शकतात. सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून मशिदीत एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचा अर्थ असा नाही की, मशिदी कायम स्वरुपात बंद केल्या आहेत. काही जणांना असे वाटत आहे की, मशीद कायम स्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत पण त्यात कोणतेही तथ्य नाही. आपण सर्वांनी सामाजिक अंतर ठेवण्यासाठी घरात नमाज केले तरी चालणार आहे. आपले सर्वांचे जबाबदारीचे सामाजिक वर्तन केवळ ती व्यक्ती, त्याचे कुटुंबच नव्हे तर हा संपूर्ण देश वाचवण्यास मदत करणार आहे. त्यानेच हा महासाथीला आपण परतावून लावू शकतो.

आम्ही तुम्हा सर्वांना पुन्हा आवाहन करत आहोत की, या संकटाच्या समयी मुस्लिम समाजाने पुढे आले पाहिजे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना बळ दिले पाहिजे, त्यांचे हात मजबूत केले पाहिजेत. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालय, सरकार व आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनांच्या निर्देशांचे, आदेशांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

अंतिमतः भारतातील प्रसारमाध्यमांनी आमच्या प्रयत्नांना सहकार्य करावे जेणेकरून या भयावह साथीच्या विरोधात सरकार व समाजाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल.

टीप : वरील आवाहन सनदी सेवेत कार्यरत असणार्या अधिकार्यांनी व्यक्तिगत स्वरुपात केलेले आहेत. जेणेकरून त्यातून कोरोना साथीवर निर्णायक मात करता  येईल.

१) आसिफ जलाल, आयपीएस (२००२ हिमाचल प्रदेश)

२) नजमुल होदा, आयपीएस, पोलिस महानिरीक्षक, तमिलनाडू-२००१ बॅच

३) सोहेल मलिक, आयआरएस २०१० बॅच, आयटी  संयुक्त आयुक्त, दिल्ली

४) राशिद मुनीर खान, आयपीएस २००८-डब्ल्यूबी

५) मुजम्मिल खान, आयएएस

६) मोहम्मद शायीन, आयएएस २००२ बॅच हरियाणा

७) मोहम्मद मुस्तफा आयपीएस १९८५ पंजाब

८) नूरुल हसन, आयपीएस, २०१५, मध्य प्रदेश

९) मोहम्मद नूर रहमान शेख, आयएफएस, २००४, भारत महावाणिज्यदूत, जेद्दा

१०) गुडरून नेहर आयआरएस २००५ बॅच, दिल्ली

११) शेख अमिचन, आयआरएस २०११ बॅच, कोलकाता

१२) डॉ. अमीर सिद्दीकी, आयआरएस २०१६ बॅच

१३) जावेद अख्तर, आयआरएस २००२ बॅच, दिल्ली

१४) डॉ. सलीम अली, आयपीएस (सेवानिवृत्त) १९७८ बॅच, त्रिपुरा

१५) शुजा महमूद आईआरपीएस, २००६ बॅच, हुबळी

१६) इम्तियाज खान, आयआरएस २००९, मुंबई

१७) मकसूद अहमद, आयपीएस, २०१६बॅच हरियाणा

१८) टीए खान, आयपीएस (सेवानिवृत्त) पश्चिम बंगाल १९६८

१९) शोकातत अहमद पर्रे, आयएएस, २०१३ बॅच पंजाब

२०) तारिक मबूद आयआरएस २००९

२१) इमामुद्दीन अहमद, आयआरएस, कमांडर, सीजीएसटी, मेंगलोर

२२) जुहैर बिन सगीर, आयएएस २००६ बॅच, उत्तर प्रदेश

२३) मोहम्मद इम्तेयाज़ आलम, आयआरटीएस, २०११ बॅच, दानापूर, बिहार

२४) मंसूर हसन खान, आईडीएएस २००२

२५) मोहम्मद रिज़वान, आयआरएस, २००४

२६) डॉ. हनीफ कुरैशी, आयपीएस १९९६, हरियाणा

२७) ज़िगाम अली खान आयआरएएस १९९९ एसईसी रेलवे छत्तीसगढ़

२८) आइशा खान, आईओएफएस, २०१३ बॅच

२९) के आसिफ हाफ़िज़, आईआरपीएस २०१० बॅच, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी, बेंगलुरु

३०) शमशाद आलम, आयआरएस २००४ बॅच

३१) डॉ. मो. रेहान रज़ा, DANICS २०१२, दिल्ली

३२) हमाद ज़फ़र, आईपीओएस, पटना, बिहार

३३) अख्तर राशिद, आयआरएस, २००६ बॅच

३४) मोहम्मद कमाल अहमद, IES १९८९ भोपाल संसद सदस्य

३५) गौड़ आलम, आयपीएस २०१७, तेलंगाना

३६) नोमान हाफिज, आईओएफएस, २०१५ बॅच

३७) सुहैल ए काज़ी, आयआरएस, २००९, पुणे, महाराष्ट्र

३८) मोहम्मद सैम, आयआरएस २०१४, हैदराबाद.

३९) शकील अहमद गनी, आयआरएस २०१६, श्रीनगर

४०) सद्दीक अहमद, आयआरएस, आयकर उपायुक्त, २०१३, हैदराबाद,

४१) माजिद खान, आयआरएस २०१३, दिल्ली।

४२) यूनुस, आयएएस २०१० बॅच हिमाचल प्रदेश

४३) मोहम्मद ओवैस आईआरटीएस, १९८९ बॅच

४४) सुबूर उस्मानी, आयआरएस २००३, महाराष्ट्र

४५) आमना तस्नीम आएएस २०१५ बॅच हरियाणा

४६) मोहम्मद ओवैस, आईआरटीएस, १९८९ बॅच

४७) वसीम अकरम, आयपीएस, हरियाणा

४८) मसरूर अहमद, आईए और एएस २०१५, ओडिशा

४९) हमना मरियम खान, आयएफएस, २००७ जेद्दा.

५०) सैयद अली अब्बास, आयपीएस, २०१८, यूपी

५१) हामिद अख्तर, आयपीएस २००८, हरियाणा

५२) अमानुल्लाह टाक, आईपी अँड टीएएफएस २०१३ (निदेशक, दूरसंचार मंत्रालय, संचार मंत्रालय)

५३) सुश्री.सुफियाह फारुकी, आयएएस, २००९, मध्य प्रदेश५४) एस एम खान, भारतीय माहिती सेवा १९८२५५) एमडी गायसुद्दीन अंसारी, आयआरएस २००४, आयटी अतिरिक्त आयुक्त, दिल्ली५६) मोहम्मद सना अख्तर, आयपीएस, २०१५ बॅच, डब्ल्यूबी५७) मोहम्मद इकबाल, आईआरटीएस, २०१४, डीडीयू५८) एम इरफान अजीज, आयआरएस २००७५९) सलीम जावेद, आईआरएएस २००३६०) अजहर ज़ेन वी पी, आयआरएस २००५६१) गुलज़ार वानी, आयआरएस २०११, दिल्ली६२) मोहम्मद समीर इस्लाम, आईडीईएस २०१५, डीईओ चंडीगढ़ सर्कल६३) ताबिश शम्स, आईडीएएस -२०१५, कानपूर६४) अब्दुल हमीद, आयपीएस २००६ बॅच६५) मोहम्मद यासर अराफात आर, आयआरएस २०१६, आसाम६६) के.ए. मोहम्मद नौशाद, आयएफएस, प्रधान मुख्य वन संरक्षक (सेवानिवृत्त), १९८७ बॅच, केरल६७) नदीम तुफैल टी, आयआयएस २०११, चेन्नई६८) अनीस रहमान, आयटीएस, २००४ बॅच, दिल्ली६९) डॉ. ओशम उर रहमान, आयआरएस, २००८, हैदराबाद७०) जहाँगीर इनामदार आयए अँड एएस २००४७१) इकबाल सैफ, आयआरएस (आयटी), २०१६, दिल्ली७२) शेख तनवीर आसिफ, आएएस, २०१७, कर्नाटक७३) असीम अनवर, आयएफएस २०१६, रियाध७४) अबदाल एम अख्तर आयएएस २०१५ बॅच, ओदिशा

COMMENTS