काश्मीरमध्ये ९०च्या दशकासारखी स्थिती; पंडितांमध्ये भीती

काश्मीरमध्ये ९०च्या दशकासारखी स्थिती; पंडितांमध्ये भीती

श्रीनगर/अनंतनागः अल्पसंख्याकावर निशाणा साधून त्यांच्या हत्यांच्या वाढत्या घटनांमुळे काश्मीरमध्ये ९०च्या दशकातील स्थिती आल्याची भीती काश्मीर पंडितांकडू

मोदी – शहा यांनी भीमा कोरेगावचा तपास महाराष्ट्राबाहेर का नेला?
मुख्यमंत्र्यांवर मानहानी, फसवणुकीचे खटले चालणार
लढवय्यी लोव्हलिना बोर्गोहेन

श्रीनगर/अनंतनागः अल्पसंख्याकावर निशाणा साधून त्यांच्या हत्यांच्या वाढत्या घटनांमुळे काश्मीरमध्ये ९०च्या दशकातील स्थिती आल्याची भीती काश्मीर पंडितांकडून व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी काश्मीर पंडितांच्या एका संघटनेने प्रशासनाला भेटून जम्मू व काश्मीरच्या अन्य भागातून काश्मीर पंडितांचे परत पलायन होत असल्याचे सांगितले.

या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत अल्पसंख्याकांवर दहशतवाद्यांकडून होत असलेल्या हल्ल्याची दखल घेत प्रशासनाने अल्पसंख्याक समुदायाला १० दिवसांची सुटी दिली आहे.

काश्मीर पंडितांनी सध्याचे प्रशासन काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप करत काश्मीर पंडितांना २०१०-११मध्ये जाहीर झालेल्या पुनर्वसन पॅकेज अंतर्गत सरकारी नोकर्यांमध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.

काश्मीर पंडित संघर्ष समितीचे (केपीएसएस) अध्यक्ष संजय टिकू यांनी काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता बडगाम, अनंतनाग, पुलवामा या भागातील सुमारे ५०० अल्पसंख्याक नागरिकांनी पलायन केल्याचे सांगितले. ही परिस्थिती १९९०मधील वाटत असल्याचे ते म्हणाले. गेल्या जूनमध्ये आम्ही उपराज्यपालांच्या भेटीची विनंती केली होती पण अद्याप ती मिळाली नसल्याचे टिकू यांनी सांगितले.

शुक्रवारी दक्षिण काश्मीरमधील काजीगुंडमधील वेसु श्रमिक शिबिरातील ३८० कुटुंबांनी काश्मीर खोरे सोडण्याचा इशारा स्थानिक प्रशासनाला दिला. या इशार्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने या कुटुंबांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. अनंतनागचे उपायुक्त पीयूष सिंगला यांनी काही पोलिस अधिकार्यांसोबत एक बैठक घेतली नंतर त्यांनी या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना पोलिस सुरक्षा देईल असे आश्वासन दिले.

वेसु श्रमिक शिबिर कर्मचारी असो.चे अध्यक्ष सन्नी रैना यांनी आम्हाला सरकारने संपूर्ण सुरक्षा देण्याचे कबुल केल्याचे सांगितले. या संघटनेचे ४,२८४ सदस्य असून संघटनेने मुख्य सचिवांना पत्र लिहून आपल्या कुटुंबांच्या जीवाला दहशतवाद्यांकडून धोका असल्याचे सांगितले. दहशतवाद्यांच्या अल्पसंख्याकांवरच्या वाढत्या हल्ल्यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण असून १९९०चा इतिहास सर्वांना माहिती आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी आम्हाला भीती वाटत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आज दहशतवाद्यांकडून अल्पसंख्याक समुदायावर हल्ले झाले तरी येथील स्थानिक मुस्लिमांनी आम्हाला सहकार्याचा हात दिला. दोन्ही समुदायात शांतता व सौहार्दाचे वातावरण आजही कायम असल्याचे सन्नी रैना यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी काश्मीरमध्ये काम करणारे २५० अल्पसंख्याक श्रमिक जम्मूकडे रवाना झाले.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्यानंतर दहशतवाद संपला अशी हाकाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. प्रत्यक्षात काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षांतील परिस्थिती चिघळत निघाली आहे.

गेल्या ६ दिवसांत ७ नागरिकांना दहशतवाद्यांनी ठार मारले, त्यातील ४ अल्पसंख्याक समुदायाचे होते.

२०२१मध्ये दहशतवाद्यांनी एकूण २८ नागरिकांना ठार मारले असून ९७ दहशतवादी हल्ले झाले आहे. यातील ७१ हल्ले सुरक्षा दलांवर व २६ नागरिकांवर झाले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0