कोरोनाबाधित सोनी सोरींची एनआयए चौकशी

कोरोनाबाधित सोनी सोरींची एनआयए चौकशी

मुंबईः कोरोना पॉझिटिव्ह असूनही आदिवासी अधिकार कार्यकर्त्या सोनी सोरी यांना भीमा मांडवी व अन्य एका प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी ८० किमी

डॉ. बाबासाहेबांची व्यापक व सम्यक विचारसरणी
दानिश यांची तालिबानकडून क्रूरपणे हत्या
‘एसटीच्या भविष्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे’

मुंबईः कोरोना पॉझिटिव्ह असूनही आदिवासी अधिकार कार्यकर्त्या सोनी सोरी यांना भीमा मांडवी व अन्य एका प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी ८० किमी दूर बोलावल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या २४ सप्टेंबरला सोनी सोरी या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या व त्यांनी आपली प्रकृती बरी नसल्याचे यंत्रणेला कळवले होते. पण तरीही छत्तीसगड येथील दंतेवाडा येथे कार्यालयात हजर राहावे, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने आदेश काढले. या आदेशानंतर दंतेवाडा येथे जाण्यासाठी त्यांना वाहन उपलब्ध झाले नाही. अखेर आपल्या भाच्यासोबत मुसळधार पावसात, अंगात ताप असताना एका मोटार सायकलवरून त्या दंतेवाडा येथे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात पोहचल्या. येथे पोहचल्यानंतर त्यांची ७ तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी आटोपल्यानंतर स्थानिक प्रशासनाने सोनी सोरी यांनी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल केले.

सोनी सोरी यांनी आपल्याला कोरोना झाल्याचे सांगूनही दंतेवाडातील सरकारी आरोग्य अधिकार्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने व दंतेवाडा पोलिसांनी त्यांची दुसरी चाचणी केली. ही चाचणीही पॉझिटिव्ह आली. या दोन्ही चाचण्या पॉझिटिव्ह येऊनही पोलिस व आरोग्य अधिकारी प्रताप देवेंद्र सिंह यांनी सोनी सोरी या कोरोना निगेटिव्ह असून त्यांची चौकशी केली जावी असे सांगितले.

आरोग्य प्रशासन एवढ्यावर थांबले नाही त्यांनी सोनी सोरी यांच्या विरोधात महासाथ संक्रमणाबाबत बेजबाबदार व निष्काळजीपणा दाखवल्याचे आरोप ठेवले. त्यांच्यावर आयपीसी १८८, २६९ व २७० कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांना जामीन देण्यात आला आहे.

द वायरने आरोग्य अधिकारी सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोनी सोरी यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचे मान्य केले. आपण आपले कर्तव्य केले. या विभागाचे आपण प्रमुख असून सोनी सोरी यांनी क्वारंटिनचे नियम तोडून प्रवास केला म्हणून पोलिसांमध्ये मला तक्रार करणे भाग पडले असे स्पष्टीकरण सिंह यांनी दिले.

राष्ट्रीय तपास यंत्रणेपुढे चौकशीसाठी जाताना सोनी सोरी कोरोना निगेटिव्ह आहेत, असे आपण का सांगितले, या प्रश्नावर सिंह यांनी मौन बाळगले.

सोनी सोरी दोन वेळा कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी मान्य केले.

या संदर्भात सोनी सोरी यांनी पोलिसांचे वर्तन माणुसकीशून्य होते अशी प्रतिक्रिया दिली. माझी चौकशी करायची होती तर काही दिवस थांबण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला काहीच अडचण नव्हती. कोरोना ही महासाथ असल्याने व तो अन्य लोकांना संकटात टाकू शकतो असे असतानाही मला दंतेवाडा येथे येण्यास भाग पाडले, असे त्या म्हणाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: