काँग्रेसचे अध्यक्षपद तूर्त सोनियांकडेच

काँग्रेसचे अध्यक्षपद तूर्त सोनियांकडेच

नवी दिल्लीः पाच राज्यात झालेल्या विधानसभेतील दारुण पराभवानंतर रविवारी काँग्रेसची चिंतनपर बैठक झाली. या बैठकीत पक्षाला नवे नेतृत्त्व देण्याऐवजी सध्याच्

बिहार निकालानंतर काँग्रेसमधली पडझड
शासन बदललं, प्रशासन बदला!
असामान्य राजकीय परिस्थितीवर विरोधकांची सामान्य प्रतिक्रिया

नवी दिल्लीः पाच राज्यात झालेल्या विधानसभेतील दारुण पराभवानंतर रविवारी काँग्रेसची चिंतनपर बैठक झाली. या बैठकीत पक्षाला नवे नेतृत्त्व देण्याऐवजी सध्याच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाची सूत्रे ठेवण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणी समितीने घेतला. रविवारी कार्यकारिणीची सुमारे ४ तास मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांच्याच नेतृत्वावर काँग्रेस कार्यकारिणीने विश्वास व्यक्त केला. त्यांनी संघटनेमध्ये बदल करावेत, त्या संदर्भात निर्णय घ्यावेत यावर सर्वांचे एकमत झाले व पक्षाचे चिंतन शिबीर पुन्हा घेण्याविषयी चर्चा झाली.

या पूर्वी चिंतन शिबीर २०१३ रोजी जयपूरला झाले होते.

या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी यांच्यासमवेत काँग्रेसचे बडे नेते व काँग्रेसमधील असंतुष्टाचा गट म्हणून ओळखला जाणारा ‘जी-२३’ गटाचे नेते गुलाम नबी आझाद व अन्य नेते उपस्थित होते.

या बैठकीबाबत काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, या वेळी पाच राज्यातल्या पराभवाबाबत चर्चा झाली. हे पराभव वरिष्ठ नेत्यांनी गंभीरपणे घेतले. आता पक्षाचे चिंतन शिबीर संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर घेण्यात येईल यावर सर्वांचे एकमत झाले.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की,  कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व नेत्यांनी आपले मते व्यक्त केली. पक्षातील त्रुटींवर खुलीपणाने चर्चा झाली. पक्षाच्या झालेल्या पराभवावर आत्ममंथन करण्याची गरज व्यक्त झाली. पाच राज्यांमध्ये जनतेने काँग्रेसविरोधात दिलेला कौल पक्षाने स्वीकारला असून काँग्रेस एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल या वर एकमत झाले. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची गरज असून भविष्याच्या दृष्टीने लवकरच चिंतन शिबीर भरवण्यात येणार आहे, असे सुरजेवाला यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: