सरकारबाबत अजून चर्चाच !

सरकारबाबत अजून चर्चाच !

पवार आणि सोनिया यांची पुन्हा चर्चा, पण निर्णय नाही.

नेपाळमध्ये मध्यावधी निवडणुका
काश्मीरात सुरक्षेचे कारण देत शिक्षक बडतर्फ
कुटुंब व समाजामधील स्त्री-पुरुषाच्या भूमिकेकडे भारतीय कसे पाहतात?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल चर्चा झाल्याचे पवार यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणात पेच निर्माण झाला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे संयुक्त सरकार स्थापन होणार की नाही, याबाबत आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा होणार होती. त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र आज त्यावर उत्तर मिळाले नाही.

सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? सरकार स्थापन करायचे की नाही? या कोणत्याही प्रश्नांवर चर्चा झाली नाही. आघाडीतल्या मित्रपक्षांनाही नाराज करुन चालणार नाही. त्यांच्याशीही चर्चा करू.

पवार म्हणाले, की सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा तिथे ए. के. अँटनीही हजर होते. महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा पेच का सुटत नाही, यावरच आम्ही चर्चा करतो आहे. महाराष्ट्रात जो काही पेच निर्माण झाला त्याबाबत सोनिया गांधी यांना मी माझ्या परिने माहिती दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.

आम्ही आमच्या पक्षाच्या राजकीय स्थितीविषयी चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कुणासोबत जायचे, कोणाबरोबर चर्चा करायची? याबाबतचा कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही.

काँग्रेसचे काही नेते आणि राष्ट्रवादीचे काही नेते महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते सोनिया गांधी आणि मला त्यांचा दृष्टीकोन सांगतील. त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे ठरवू, असे पवार म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: