सीरमच्या १० लाख लसी आफ्रिकेने परत पाठवल्या

सीरमच्या १० लाख लसी आफ्रिकेने परत पाठवल्या

बंगळुरूः एका क्लिनिकल ट्रायलनंतर द. आफ्रिकेने आपली कोविड-१९विरोधातील लसीकरण मोहीम थांबवली असून सीरम इन्स्टिट्यूटने देऊ केलेल्या लसींपैकी १० लाख कोविड-

देशात ४८ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण
खासगी रुग्णालयातील लसींची किंमत निश्चित
दिल्लीत गोंधळ राज्यातही गोंधळ…

बंगळुरूः एका क्लिनिकल ट्रायलनंतर द. आफ्रिकेने आपली कोविड-१९विरोधातील लसीकरण मोहीम थांबवली असून सीरम इन्स्टिट्यूटने देऊ केलेल्या लसींपैकी १० लाख कोविड-१९ लसी परत घ्याव्यात असे द. आफ्रिकेच्या सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला सांगितले आहे. पण या इन्स्टिट्यूटकडून देशात लसीची विक्री केली जाऊ शकते असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने कोविड-१९वर एस्ट्राजेनेका लस विकसित केली आहे आणि या कंपनीने द. आफ्रिकेला १० लाख लसींचा खुराक गेल्या आठवड्यात पाठवला आहे व येत्या काही आठवड्यात सरकार ५ लाख लसी नागरिकांना देणार होते. पण द. आफ्रिकेत ‘५०१ वाय कोरोना विषाणू’चा नवा प्रकार आढळल्याने त्यांनी आपला लसीकरण कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

द. आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणू प्रकारामुळे होणार्या आजारावर एस्ट्राजेनेका केवळ मर्यादित सुरक्षा देत असल्याचा संशोधन अहवाल विटनवेस्टर व ऑक्सफोर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केला होता. त्यानंतर द. आफ्रिकेने ही पावले उचलली आहेत.

सोमवारीच आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने एस्ट्राजेनेका/ऑक्सफोर्ड लस आणीबाणीच्या काळात वापरावी अशा सूचना दिल्या होत्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0