भारताच्या ताब्यातले प्रदेश परत मिळवूः नेपाळचे पंतप्रधान

भारताच्या ताब्यातले प्रदेश परत मिळवूः नेपाळचे पंतप्रधान

नवी दिल्लीः कालापानी, लिम्पियाधुरा व लिपूलेख हे तीन भाग भारताकडून घेण्यात येतील असे वादग्रस्त विधान नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी केले आहे

‘चीनपेक्षा भारतानेच अनेक वेळा घुसखोरी केली’
भारतीय ठाण्यानजीक चीनचे शस्त्रसज्ज सैन्य तैनात
Tik Tok सह ५९ चिनी ऍप्सवर बंदी

नवी दिल्लीः कालापानी, लिम्पियाधुरा व लिपूलेख हे तीन भाग भारताकडून घेण्यात येतील असे वादग्रस्त विधान नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी केले आहे. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली १४ जानेवारीला भारत दौर्यावर येत असताना ओली यांनी हे विधान केले आहे.

रविवारी नेपाळच्या नॅशनल असेंब्लीपुढे भाषण करताना ओली यांनी भारताच्या ताब्यात असलेले हे तीन भाग नेपाळमध्ये आणण्याचे धाडस आपल्याकडे असून गेल्या सरकारने ही धमक दाखवली नव्हती, अशीही पुस्ती जोडली.

कालापानी, लिम्पियाधुरा व लिपूलेख हे सुगौली करारानुसार नेपाळचे भाग आहेत. हे प्रदेश राजनैतिक पातळीवर परत मिळवले जातील असेही ते म्हणाले.

काही माणसं नेपाळचा नवा राजकीय नकाशा तयार केल्याने अस्वस्थ झाले आहेत. या नकाशात भारताच्या ताब्यात असलेले तीन भाग होते. पण वास्तविक हे तीन भाग नेपाळचेच असून भारतासोबत ही चर्चा करताना पूर्वीचे सरकार बचावाची भूमिका घेत होते. पण आपले सरकार हे तीनही भाग परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे ओली म्हणाले.

नेपाळची संसद बरखास्त झाल्यानंतर प्रथमच ओली यांनी असे वादग्रस्त विधान केले आहे. नेपाळच्या मध्यावधी निवडणुका येत्या एप्रिल व मे महिन्यात घेतल्या जाणार आहेत.

मूळ बातमी

हेही वाचा नेपाळच्या दोन्ही सभागृहांची वादग्रस्त नकाशाला मंजुरी

भारताच्या ताब्यातील प्रदेश आमचाच; नेपाळचा दावा

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0