इम्रान खान सरकार पडण्याची शक्यता; मित्र पक्षांनी साथ सोडली

इम्रान खान सरकार पडण्याची शक्यता; मित्र पक्षांनी साथ सोडली

नवी दिल्लीः पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली सरकार पडण्याची शक्यता वाढली आहे. बुधवारी इम्रान खान यांचा निकटचा व सत्तेतील मित्र पक्ष मुत्त

राज्यसभेच्या ३ जागांमुळे बदलले म. प्रदेशचे राजकारण
‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन
तत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन

नवी दिल्लीः पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली सरकार पडण्याची शक्यता वाढली आहे. बुधवारी इम्रान खान यांचा निकटचा व सत्तेतील मित्र पक्ष मुत्ताहिद कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम)ने सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले. पक्षाचे नेते खालिद मकबूल सिद्दीकी यांनी ही घोषणा करताना आपण आता विरोधकांच्या गटात असल्याचे जाहीर केले.

इम्रान खान यांच्या सरकारला नॅशनल असेंब्लीमध्ये पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे त्यांना एमक्यूएमचा पाठिंबा मिळणे महत्त्वाचे आहे. एमक्यूएम हा सत्तेतही भागीदार असल्याने या पक्षाने विरोधकांची साथ देण्याचे जाहीर केल्याने नॅशनल असेंब्लीत अविश्वासाचा ठराव इम्रान खान यांना जड जाणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

बुधवारी सिद्दीकी यांच्यासोबत प्रमुख विरोधी पक्ष नेते शाहबाज शरीफ व बिलावल भुत्तो उपस्थित होते. या दोघांच्या उपस्थितीत सिद्दीकी यांनी आपण सरकारमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. संसदेत बहुमत नसल्याने इम्रान खान यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा अशी विनंतीही सिद्दीकी यांनी केली.

दरम्यान अविश्वासाच्या ठरावाचा पाकिस्तान पीपल्स पार्टी व एमक्यूएम दरम्यानच्या सध्याच्या राजकीय समीकरणाचा काहीएक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी दिले आहे. कराची व पाकिस्तानमध्ये समृद्धी आणायची असेल तर आम्हा दोघांना एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत भुत्तो यांनी व्यक्त केले आहे. इम्रान खान यांनी बहुमत गमावले आहे, त्यांना पंतप्रधान राहण्याचा हक्क नाही असेही भुत्तो म्हणाले.

गुरुवारपासून नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन सुरू होत असून चार दिवसांनी अविश्वास ठरावावर मतदान घेतले जाणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: