शहाबाझ शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

शहाबाझ शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

इस्लामाबादः पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) पक्षाचे अध्यक्ष शहाबाझ शरीफ यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून सोमवारी बिनविरोध निवड झाली. सोमवारी नॅशनल अ

आ लौटके आजा मेरे मीत……
सरकारच म्हणतेय की एनपीआरचा एनसीआरशी संबंध
छोटे व मध्यम उद्योजकांना आता १ लाख कोटीचे पॅकेज

इस्लामाबादः पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) पक्षाचे अध्यक्ष शहाबाझ शरीफ यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून सोमवारी बिनविरोध निवड झाली. सोमवारी नॅशनल असेंब्लीमध्ये नव्या पंतप्रधानपदासाठी मतदान झाले. या मतदानावर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाने बहिष्कार घातल्याने शहाबाझ शरीफ यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

७० वर्षांचे शहाबाझ शरीफ हे पाकिस्तानच्या राजकारणातले जुने जाणते नेते असून ते पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान झाले आहेत. शहाबाझ शरीफ हे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहात होते. हा प्रांत सर्वाधिक लोकसंख्येचा असून या प्रांताचे तीनवेळा मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवले आहे.

नव्या पंतप्रधानपदासाठी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी शहाबाझ शरीफ यांच्या नावाची शिफारस केली. पाकिस्तान पीपल्स पार्टी व पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ शरीफ गट) या दोघांनी मिळून इम्रान खान सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव संसदेत संमत केला होता व या सरकारला पदच्युत केले होते.

नव्या सरकारकडे ३४२ सदस्य असलेल्या नॅशनल असेंब्लीतील १७२ सदस्यांचा पाठिंबा आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0