भाजपकडून मोफत वीज; सपाकडून कर्जमुक्तीचे आश्वासन

भाजपकडून मोफत वीज; सपाकडून कर्जमुक्तीचे आश्वासन

लखनौः शेतकऱ्याला त्याच्या शेतात सिंचनासाठी निःशुल्क वीज, विहीर-ट्यूबवेल-शेततळी-पाटांसाठी विशेष अर्थसाह्य, लव जिहाद कायद्यातंर्गत दोषींना १० वर्ष काराव

कोलकाता पोलिसांची नुपूर शर्माविरोधात लुकआउट नोटीस
देशाला आज आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज का आहे?
आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम

लखनौः शेतकऱ्याला त्याच्या शेतात सिंचनासाठी निःशुल्क वीज, विहीर-ट्यूबवेल-शेततळी-पाटांसाठी विशेष अर्थसाह्य, लव जिहाद कायद्यातंर्गत दोषींना १० वर्ष कारावास व १ लाख रु.चा दंड, राज्यातल्या १८ विभागांत भ्रष्टाचारविरोधी पथके, अयोध्येत रामायण विद्यापीठ अशा घोषणा असलेला उत्तर प्रदेशासाठीचा आपला जाहीरनामा मंगळवारी भाजपने जाहीर केला. मुख्यमंत्री आदित्य नाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यातल्या वरिष्ठ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

या जाहीरनाम्यात लव जिहाद, राज्यातील गुन्हेगारी, दहशतवाद यांच्याविरोधात कडक पावले उचलली जातील यावर भर देण्यात आला आहे. भाजपने मीरत, रामपूर, आझमगड, कानपूर, बहरैच येथे दहशतवादविरोधी पथक केंद्र स्थापन करण्याचेही जाहीर केले आहे. सत्तेत आल्यास देवबंद येथील दहशतवादविरोधी केंद्राचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल, असेही आश्वासन भाजपने दिले आहे.

गहू, भात यांना योग्य हमीभाव, विक्री झालेल्या साखरेची किंमत१४ दिवसांत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणे, होळी व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांना मोफत एलपीजी सिलेंजर, ६० वर्षांवरील महिलांना मोफत सार्वजनिक प्रवास, कॉलेजला जाणाऱ्या हुशार मुलींना मोफत स्कुटी, महिलांसाठी १ हजार रु. खर्च करून सार्वजनिक शौचालये, राज्यात विविध ठिकाणी ३ हजार पिंक पोलिस बूथ स्थापन अशाही अन्य घोषणा आहेत. आगामी ५ वर्षांत राज्यात १० लाख कोटी रु.ची गुंतवणूक येईल असाही विश्वास या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक, अपंग व विधवांना दरमहा १५०० रु.ची पेन्शन, बांधकाम मजुरांना मोफत विमा संरक्षण व त्यांच्या मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण अशाही अन्य घोषणा करण्यात आल्या आहेत.

. पा.च्या जाहीरनाम्यात शेतकऱी कर्जमुक्तीची घोषणा

समाजवादी पार्टीनेही बुधवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात सर्व पिके एमएसपी अंतर्गत आणली जातील आणि २०२५ पर्यंत सर्व शेतकरी कर्जमुक्त होतील. सर्व शेतकर्‍यांना सिंचनासाठी मोफत वीज, शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिला आणि मुलींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण, मुलींचे शिक्षण केजी ते पीजीपर्यंत मोफत केले जाईल, असेही आश्वासन आहे. या शिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी १०९० हा क्रमांक पुन्हा आणण्यात येणार असून, त्याअंतर्गत महिला ईमेल आणि व्हॉट्सअॅपवर एफआयआर नोंदवू शकतील. महिलांना दरवर्षी दोन मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0