भीमा-कोरेगाव : ९ कार्यकर्त्यांवर स्पायवेअरचा हल्ला!

भीमा-कोरेगाव : ९ कार्यकर्त्यांवर स्पायवेअरचा हल्ला!

भारतातील नऊ मानवी हक्क कार्यकर्ते २०१९ मध्ये झालेल्या एका "स्पायवेअर हल्ल्या”च्या लक्ष्यस्थानी होते, अशी माहिती अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने टोरोण्टो विद्या

एल्गार परिषद प्रकरणः वर्नन गोन्साल्विस यांना डेंग्यूची लागण, रुग्णालयात दाखल
एल्गार परिषद प्रकरणातील ३ अन्य आरोपी कोरोनाबाधित
हे त्यांच्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकते!

भारतातील नऊ मानवी हक्क कार्यकर्ते २०१९ मध्ये झालेल्या एका “स्पायवेअर हल्ल्या”च्या लक्ष्यस्थानी होते, अशी माहिती अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने टोरोण्टो विद्यापीठातील सिटिझन लॅबच्या सहयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे पुढे आली आहे. या आठपैकी नऊ कार्यकर्ते भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी काम करत होते.

“जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या काळात एचआरडींना (मानवी हक्क रक्षक) द्वेषमूलक लिंक्स असलेल्या ईमेल्स पाठवून लक्ष्य करण्यात आले,” असे अहवालात नमूद आहे. “या लिंक्सवर क्लिक केल्यास व्यावसायिक स्तरावर उत्पादन केलेले विंडोज स्पायवेअर डिप्लॉय होते आणि लक्ष्यस्थानी असलेल्या व्यक्तीने विंडोज कम्प्युटर्सद्वारे  केलेल्या हालचाली व संवाद स्पायवेअरद्वारे टिपले जातात. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व खासगीत्वाच्या (प्रायव्हसी) तत्त्वाचे उल्लंघन आहे.”

काही व्यक्तींना अनेकदा लक्ष्य केले गेले याची नोंद अॅम्नेस्टीने घेतली आहे. यातून भीमा कोरेगाव प्रकरणातील एचआरडींविरोधात झालेल्या स्पायवेअर हल्ल्याचा धक्कादायक नमुना समोर येत आहे, असे अहवालात म्हटले आहे. हे एचआरडी देशातील मानवी हक्कांच्या उल्लंघनावर खुली टीका करत होते. महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या निषेधमोर्च्याच्या व हिंसाचाराच्या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी अटक झालेल्या ११ कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी यातील ८ जणांनी केली होती. स्पायवेअरच्या लक्ष्यस्थानी असलेल्यांपैकी एका व्यक्तीचा या घटनेशी थेट संबंध नाही. मात्र, महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ जीएन साईबाबा यांच्या सुटकेची मागणी या व्यक्तीने लावून धरली होती.

स्पायवेअर प्रकरणाचा तपास करणाऱ्यांना जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या काळात या कार्यकर्त्यांना पाठवलेल्या गेलेले “१२ स्पीअर फिशिंग ईमेल्स” ओळखण्यात यश मिळाले आहे. त्यांच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीने नाव वापरून व्यक्तिगत स्वरूपाची ईमेल पाठवायची आणि त्याद्वारे हे द्वेषपूर्ण सॉफ्टवेअर त्यांच्या कम्प्युटरवर किंवा फोनवर इन्स्टॉल करण्याचा हा प्रयत्न आहे. स्पीअर फिशिंग हल्ल्याद्वारे या व्यक्तींची गोपनीय व खासगी संभाषणे उघड होतात.

“हा सायबर-गुन्हे हल्ला नाही पण एचआरडींच्या उपकरणांवर नियंत्रण मिळवण्याची स्पायवेअर मोहीम आहे असे संकेत स्पीअर फिशिंग ईमेल्स आणि स्पायवेअरवरून मिळत आहेत,” असे अहवालात म्हटले आहे. मात्र, हा हल्ला एखाद्या विशिष्ट गटाने केल्याचा निष्कर्ष आमच्या अन्वेषणातून निघू शकला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यातील तीन कार्यकर्त्यांना गेल्या वर्षी एनएसओ ग्रुपच्या पीगॅसस स्पायवेअरद्वारे लक्ष्य करण्यात आल्याची नोंद अहवालात आहे.  मे २०१९मधील दोन आठवड्यांच्या काळात पीगॅसस व्हॉट्सअॅप सॉफ्टवेअर वापरून किमान १२१ भारतीयांच्या सुरक्षितता उपकरणांची सुरक्षितता भेदण्यात आली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, किमान १२१ व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची माहिती अज्ञात हॅकर्सद्वारे फोडली गेली. स्पायवेअर एका इझ्रायली कंपनीने विकसित केले असून, केवळ सरकारी यंत्रणाच हे खरेदी करू शकतात असा दावा या कंपनीने केला आहे. उपकरणांवर अशा पद्धतीने बेकायदा देखरेख ठेवण्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.

भीमा कोरेगाव प्रकरण

पुण्याजवळील भीमा कोरेगाव नावाच्या गावात १ जानेवारी २०१८ रोजी दलित व मराठा समुदायांमध्ये हिंसाचाराच्या घटना झाल्या होत्या. मराठा साम्राज्यातील राज्यकर्ते व जातीने ब्राह्मण असलेल्या पेशव्यांचा १८१८ साली याच दिवशी ब्रिटिशांच्या सैन्यातील दलित सैनिकांनी पराभव केला होता. तो दिवस साजरा करण्यासाठी एल्गार परिषदेने पुण्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन १ जानेवारी २०१८ रोजी केले होते. दलित संघटनांनी २ जानेवारी रोजी पुकारलेल्या बंददरम्यान झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता.

पुणे पोलिसांनी एप्रिल २०१८ मध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकले आणि दोन टप्प्यांमध्ये १० कार्यकर्त्यांना अटक केली. ६ जून, २०१८ रोजी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन आणि महेश राऊत यांना नागपूरहून तर रोना विल्सन यांना नवी दिल्लीतून अटक झाली. २८ ऑगस्ट, २०१८ रोजी पोलिसांनी सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, व्हेरनॉन गोन्साल्विस, वरावर राव आणि गौतम नवलाखा या आणखी पाच कार्यकर्त्यांना अटक केली. सुरुवातीला कार्यकर्त्यांवरील आरोप भीमा कोरेगावमध्ये हिंसाचाराला चिथावणी देण्याइतपत मर्यादित होते. नंतरच्या काळात ते माओवादी कट रचून देशभरातील लोकशाही डळमळीत करण्यामध्ये सहभाग घेणे, फॅसिस्टविरोधी आघाडी उभारून सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणे इतके तीव्र करण्यात आले. या सर्व कार्यकर्त्यांवर ‘शहरी नक्षलवादी’ असा शिक्का मारण्यात आला आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या पक्षाचे सदस्य असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: