लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटातः राजपक्षे

लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटातः राजपक्षे

कोलंबोः कोरोना महासाथीत देशव्यापी लॉकडाउन लावल्याने देशाची अर्थव्यवस्था बिघडत गेली व त्यामुळे परकीय गंगाजळी आटत गेली असे स्पष्टीकरण श्रीलंकेचे पंतप्रध

कर्नाटकातला पेच आता सर्वोच्च न्यायालयात
लंका आणि लंकेश्वर
कर्नाटकातील घोडे बाजार

कोलंबोः कोरोना महासाथीत देशव्यापी लॉकडाउन लावल्याने देशाची अर्थव्यवस्था बिघडत गेली व त्यामुळे परकीय गंगाजळी आटत गेली असे स्पष्टीकरण श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात दिले. विरोधकांनी आपले आंदोलन थांबवावे व सरकारला साथ द्यावी असेही आवाहन राजपक्षे यांनी केले आहे. निदर्शनांसाठी रस्त्यावर उतरलेल्या जनतेचा प्रत्येक मिनिट डॉलरची येणारी आवक थांबवत आहे. सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी सरकार २४ तास प्रयत्न करत आहे. कोविड महासाथीत देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर सरकारला आपले सर्व लक्ष केंद्रीत करावे लागले, त्याचा अर्थव्यवस्थेला झटका बसला, परकीय गंगाजळी संपत गेली व देश अभूतपूर्व अशा आर्थिक संकटात सापडल्याचे राजपक्षे यांनी सांगितले.

देशात आलेल्या आर्थिक संकटावरून गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या विविध भागात सरकारविरोधात निदर्शने झाली होती. ही निदर्शने रोखण्यासाठी सरकारने सिंहली व तामिळ नववर्षाच्या निमित्ताने सुट्याही जाहीर केल्या होत्या. पण या काळात महागाईने विक्रम केला. देशभर वीज खंडित झाली होती. अन्नधान्य, इंधनाची एवढी टंचाई निर्माण झाली होती की १९४८ मध्ये ब्रिटिशांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळवलेल्या श्रीलंकेवर पहिल्यांदाच अशी आर्थिक आणीबाणीची वेळ आली आहे. सध्या श्रीलंकेत अन्नधान्य, पेट्रोलजन्य पदार्थांच्या खरेदीसाठी जनतेच्या प्रचंड रांगा लागल्याचे दृश्ये आहेत. देशाला परकीय चलन मिळवून देणारा पर्यटन उद्योग कोविड महासाथीत उध्वस्त झाला असून परकीय चलन मिळवण्यासाठी श्रीलंकेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परकीय चलनाची टंचाई असल्याने श्रीलंका अन्नधान्याची आयातही करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: