श्रीलंकेत बुरखा, हजार मदरश्यांवर बंदी

श्रीलंकेत बुरखा, हजार मदरश्यांवर बंदी

कोलंबोः श्रीलंका सरकारने मुस्लिम महिलांवर असलेली बुरखा सक्ती व देशातील सुमारे १००० हून अधिक मदरसे बंद करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा लवकरच प्रत्यक्

ट्विटरचा भारताच्या राजकारणात हस्तक्षेपः राहुल गांधी
उ. प्रदेशः मंत्र्यांच्या मुलाच्या गाडीखाली २ शेतकरी चिरडून ठार
शेतकरी आंदोलनातली ‘सुप्रीम’ मध्यस्थी कशासाठी?

कोलंबोः श्रीलंका सरकारने मुस्लिम महिलांवर असलेली बुरखा सक्ती व देशातील सुमारे १००० हून अधिक मदरसे बंद करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा लवकरच प्रत्यक्षात आणली जाणार असून मंत्रिमंडळासमोर या संदर्भात योजना ठेवून हे निर्णय घेतले जाणार आहेत. ही योजना राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केल्याचे लोकसुरक्षामंत्री शरत वीरसेकरा यांनी म्हटले आहे.

एका बौद्ध मंदिरात कार्यक्रमादरम्यान वीरसेकरा यांनी बुरख्याची सक्ती हा राष्ट्रीय सुरक्षिततेवर परिणाम करणारा घटक असल्याचेही विधान केले. श्रीलंकेत राष्ट्रीय शिक्षण धोरण असताना मदरसे ते धोरण पाळत नाहीत, मदरश्यांची अधिकृत नोंद केली जात नाही, त्यामुळे देशातील हजारहून अधिक मदरसे बंद केले जाणार असल्याचेही वीरसेकरा यांनी सांगितले.

श्रीलंकेत २०१९मध्ये ईस्टरच्या दिवशी चर्च व हॉटेलमधील सीरीयल बॉम्बस्फोट झाले होते, त्यात २६०हून अधिक नागरिक ठार झाले होते. त्यावेळी श्रीलंकेच्या सरकारने बुरख्यावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

श्रीलंकेची लोकसंख्या २ कोटी २० लाख इतकी असून मुस्लिमांची लोकसंख्या ९ टक्के, हिंदुंची १५ टक्के व बौद्धांची ७० टक्के इतकी आहे.

गेल्याच आठवड्यात स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक जीवनात चेहरा झाकण्याच्या सक्तीविरोधात जनमत घेतले होते. या जनमताला विरोधी पक्षांनी विरोध केला होता. या जनमतात ५१.२ टक्के मतदान सार्वजनिक जीवनात चेहरा झाकू नये याच्या समर्थनार्थ होते. पण या प्रस्तावातून बुरखा किंवा हिजाब असे शब्द वगळण्यात आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0