काश्मीरमध्ये ‘जैश’च्या हल्ल्यात २ पोलिस शहीद

काश्मीरमध्ये ‘जैश’च्या हल्ल्यात २ पोलिस शहीद

श्रीनगरः शहरानजीक नौगाम भागात शुक्रवारी सकाळी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात जम्मू व काश्मीर पोलिस दलातील दोन जवान शहीद व एक

हवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड
ट्रंपभक्तांच्या गुंडगिरीची वर्षपूर्ती
हल्ल्याचा सर्व थरांतून निषेध

श्रीनगरः शहरानजीक नौगाम भागात शुक्रवारी सकाळी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात जम्मू व काश्मीर पोलिस दलातील दोन जवान शहीद व एक जवान जखमी झाला. पण दहशतवादी पळून गेले. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशाच्या स्वातंत्र्यादिनाच्या निमित्ताने संपूर्ण जम्मू व काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला.

शुक्रवारी सकाळी नौगाम बायपासच्या जवळ पोलिसांची एक तुकडी तैनात असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार करत पोबारा केला. यात तीन पोलिसांना गोळ्या लागल्या त्यापैकी दोघे जवान इस्पितळात नेल्यानंतर मरण पावले.

या हल्ल्याची गुप्तचर यंत्रणांकडून पूर्वसूचना मिळाली होती का, असा प्रश्न काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांना विचारला असता, त्यांनी पोलिसांना अशा सूचना सतत मिळत असतात. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन दिवशी दहशतवादी हल्ल्यांची शक्यता असते. त्यामुळे पोलिस दल तयारीतच होते असे सांगितले. पण दहशतवाद्यांनी नागरिकांची गजबज पाहून अरुंद गल्लीचा फायदा घेत पोलिसांवर गोळीबार केला व ते पळून गेले. पोलिसांनी सर्व भाग सील केले असून या दहशतवाद्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, नौगाम भागात सकाळी नागरिकांची गजबज होती, त्यात पोलिसांनी दहशतवाद्यांवर गोळीबाराचा प्रयत्न केला असता तर नागरिकांच्या जीवाला तो धोका होता, तो टाळावा लागला असेही विजय कुमार म्हणाले.

दरम्यान या हल्ल्याचा निषेध पीडीपीने केला असून अशा हल्ल्याने काश्मीरमधील परिस्थिती चिघळत राहते, अशी प्रतिक्रिया पक्षाने दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0