श्रीवास्तव ग्रुपच्या संस्थापकाची सुरस कहाणी

श्रीवास्तव ग्रुपच्या संस्थापकाची सुरस कहाणी

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरच्या दौऱ्यावर काही दिवसांपूर्वी युरोपियन युनियनचे २३ संसद सदस्य आले होते. हा दौरा अनधिकृत पण खासगी स्वरुपाचा असल्याने व दे

काँग्रेसने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली
नुपूर शर्मा प्रकरण : ‘टाइम्स नाऊ’च्या नाविका कुमारविरोधात एफआयआर
टीआरपी घोटाळाः अर्णवचा आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरच्या दौऱ्यावर काही दिवसांपूर्वी युरोपियन युनियनचे २३ संसद सदस्य आले होते. हा दौरा अनधिकृत पण खासगी स्वरुपाचा असल्याने व देशातल्या अन्य राजकीय पक्षांना काश्मीर खोऱ्यात जाण्यापासून रोखण्यात येत असताना या आगुंतक पाहुण्यांना काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी केंद्र सरकारने रेडकार्पेट अंथरण्याने देशाचे राजकारण तापले होते. या भेटीमागे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका संस्थेच्या संचालक मादी शर्मा यांचा हात असल्याने आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगीने हा दौरा आखल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्याच बरोबर या संपूर्ण दौऱ्याचा आर्थिक भार कोणालाच माहिती नसलेल्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर नॉन अलांइड स्टडिज’ या संस्थेने स्वत:च्या शिरावर घेतल्याने अनेक शंका-कुशंकांना वाव मिळाला होता.

‘द वायर’ने बुधवारीच ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर नॉन अलांइड स्टडिज’ ही संस्था दिल्लीस्थित श्रीवास्तव ग्रुपकडून चालवली जात असल्याचेही वृत्त दिले होते. या ग्रुपची आर्थिक परिस्थिती, त्यांची बॅलनशीट फारशी योग्य नाही, त्यांची उलाढालही फारशी नसल्याचे पुढे आणले होते.

तर हा ग्रुप ऑक्टोबर महिन्यापासून मीडियाच्या दृष्टीने चर्चेत आला.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीस ‘ईपी टुडे’ या एका वृत्त संकेतस्थळाकडून रशिया टुडे या वृत्तसंस्थेच्या बातम्या मोडतोड करून प्रसिद्ध केल्याचे उघडकीस आले होते. ईपी टुडेचे असे काम हे युरोपमधील कायदे करणाऱ्या लॉबीवर दबाव आणण्याचे होते. आणि हे वृत्त संकेतस्थळ श्रीवास्तव ग्रुपकडून चालवले जात असल्याचे दिसून आले होते.

आश्चर्याची गोष्ट अशी की, १९८७मध्ये अमेरिकेच्या प्रशासनाने श्रीवास्तव ग्रुपचे संस्थापक गोविंद नरेन श्रीवास्तव यांच्यावर मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या, माहिती पसरवण्याचा आरोप ठेवला होता. अमेरिकेच्या प्रशासनाचा असा दावा होता की श्रीवास्तव ग्रुपकडून पसरवली जाणारी माहिती ही सोव्हिएट रशियाच्या हिताची होती आणि त्यांचे लक्ष्य अमेरिका होते.

सप्टेंबर १९८६मध्ये झिम्बाब्वेतील हरारे येथे अलिप्तता परिषद (नाम) आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या कामकाजात अमेरिका हस्तक्षेप करत असल्याचा प्रचार सोव्हिएट रशियाला हवा होता. तो प्रचार करण्याचे काम श्रीवास्तव ग्रुपकडून केले जात होते. त्यावेळी अमेरिका अलिप्ततावादी गटाच्या देशांवर आर्थिक निर्बंधांची धमकी घालत असल्याची वृत्ते सोव्हिएट रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेकडून दिली जात होती आणि तसे उल्लेख गोविंद नरेन श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या Conspiracy against the Nonaligned Movement या पुस्तकात आढळतात.

पण हे गोविंद श्रीवास्तव पत्रकार म्हणूनही काम करत होते. त्यांचे उत्तर कोरियातील कम्युनिस्ट राजवटीशी घनिष्ठ संबंध होते.

१२ डिसेंबर २०१२ मध्ये उत्तर कोरिया (डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया) सरकारच्या ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी’ (केसीएनए) मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात उ. कोरियाची राजधानी प्याँगयाँगमधील बोटॅनिकल गार्डनला पेरुचे झाड भेट दिल्याचा उल्लेख आहे. हे झाड गोविंद श्रीवास्तव यांनी उ. कोरियाचे जनरल सेक्रेटरी किम जोंग इल यांना भेट दिल्याचा उल्लेख आहे. या लेखात गोविंद श्रीवास्तव हे Asian Regional Institute of the Juche Idea (एशियन रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ज्युश आयडिया) चे सरचिटणीस असल्याचा उल्लेख आहे. कोरियन भाषेत Juche चा अर्थ स्वयंपूर्ण असा होतो. ‘किम जोंग इल यांनी माझी व माझ्या कुटुंबाची काळजी घेतल्याची कृतज्ञता म्हणून मी (गोविंद श्रीवास्तव) हे झाड भेट देत आहे’, असा उल्लेख या लेखात आहे.

पेरुचे झाड देण्यामागे एक घटना घडली होती. ती अशी की, जुलै १९८१मध्ये गोविंद श्रीवास्तव प्याँगयाँगहून विमानाने येत असताना त्यांची तब्येत अचानक खालावली आणि ते कोमामध्ये गेले. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दुसऱ्या देशात उतरवण्यात आले. गोविंद श्रीवास्तव यांनी स्थापन केलेली ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर नॉन अलांइड स्टडिज’ ही संस्था अलिप्तता गट स्थापन (सप्टेंबर १९८०) होण्यानंतर एक वर्षाने स्थापन झाली होती, ही घटनाही विशेष आहे.

जेव्हा गोविंद श्रीवास्तव यांची प्रकृती ढासळल्याची माहिती किम जोंग इल यांच्यापर्यंत पोहचली तेव्हा त्यांनी ताबडतोब एक वैद्यकीय पथक व औषधे गोविंद श्रीवास्तव यांच्यापर्यंत पोहचवली. त्याचबरोबर आपल्या मुलालाही त्यांनी रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी पाठवले.

या लेखाच्या शेवटच्या भागात गोविंद श्रीवास्तव यांनी किम जोंग इल यांनी दाखवलेले प्रेम व कृतज्ञतेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

२०१३मध्ये गोविंद श्रीवास्तव यांची ही कथा ‘कोरियन टुडे’ या इंग्रजी मासिकातही प्रसिद्ध झाली होती. हे मासिक उ. कोरिया सरकारचे प्रचारकी मासिक आहे. या मासिकात पुन्हा गोविंद श्रीवास्तव यांनी किम जोंग इल यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त केली त्यासंदर्भात एक उतारा आहे :

“To a man as a social being, there is no greater happiness than to live under loving care and trust because they are the greatest boon a man can grant to another man. And so when you are loved and trusted by a great man whom all people look up to, how blessing and glorious it will be! In this sense I say I am a luckiest man in the world.”

गोविंद श्रीवास्तव यांचे अखेरपर्यंत उ. कोरियाशी घनिष्ठ संबंध होते.

केसीएनएच्या आणखी एका लेखात गोविंद श्रीवास्तव हे १९९७मध्ये जपानमध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत एक संचालक म्हणून हजर झाल्याचा उल्लेख आहे. ही परिषद कोरियन संकल्पना ‘स्वावलंबन’वर आधारित होती आणि या परिषदेत हजर असलेल्या गोविंद श्रीवास्तव यांच्यासह सर्वांना किम जोंग इल यांच्याकडून भेटवस्तू पाठवण्यात आल्या होत्या.

फेब्रुवारी १९९९मध्ये गोविंद श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचे- प्रमिला श्रीवास्तव – सांत्वन करणारा एक संदेश उ. कोरियाचे नेते किम योंग नाम यांनी पाठवला होता. याचा उल्लेख केसीएनएच्या अहवालात आहे. या अहवालात किम यांनी गोविंद श्रीवास्तव यांच्या सामाजिक कार्याची स्तुती करत ते अखेरपर्यंत स्वावलंबन संकल्पनेचे पुरस्कर्ते राहिल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. या अहवालात गोविंद श्रीवास्तव यांच्या निधनाने स्वावलंबन संकल्पनेचा एक प्रणेता हरवल्याने समाजाचे किती नुकसान झाले आहे, असेही उल्लेख आहेत.

आपल्या मृत्यूपर्यंत गोविंद श्रीवास्तव ‘एशियन रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ज्युश आयडिया’ या संस्थेचे सरचिटणीस म्हणून काम करत होते. उ. कोरियाचे भारतात जे काही कार्यक्रम होत होते त्या कार्यक्रमाचे एक संयोजक म्हणून गोविंद श्रीवास्तव यांचे नाव असे.

‘एशियन रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ज्युश आयडिया’ या संस्थेचे स्वत:चे एक संकेतस्थळ आहे. पण या संकेतस्थळावरील मोबाइल क्रमांकावर फोन केल्यास तो फोन लागत नाही. पण लँडलाइनवर केल्यास एक महिला तो फोन उचलते पण मला या संस्थेची काही माहिती नाही असे उत्तर देते.

गोविंद श्रीवास्तव यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्यांच्या पत्नीने प्रमिला यांनी अलिप्ततावादी चळवळीवरील एक पुस्तकाचे संपादन केले. या पुस्तकात त्यांनी आपल्या पतीच्या कार्याची प्रशंसा केली आहे. या पुस्तकात अनेक निवृत्त भारतीय राजदुतांचे लेख आहेत. या पुस्तकाचे परिक्षण माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंग यांनी केले होते. तो लेख डिसेंबर २००१मध्ये फ्रंटलाइन या मासिकात प्रसिद्ध झाला होता.

(या लेखाला अजोय आशीर्वाद महाप्रशस्त यांचीही मदत झाली आहे)

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0