मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली असून, १३ एप्रिलपर्यंत न्यायालयाने कोठडी दिली आहे. राष्ट्र
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली असून, १३ एप्रिलपर्यंत न्यायालयाने कोठडी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील झालेल्या आंदोलनप्रकरणी आणि घरावर हल्ला केल्याप्रकरणात अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आंदोलनाच्या दिवशी गुणवंत सदावर्ते हे नागपूर येथील एका व्यक्तीशी संपर्कात होत़े याबाबत पोलीस अधीक तपास करत असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली़
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना नवीन माहिती न्यायालयाला दिली. शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे आंदोलन करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने दूरध्वनी करुन काही पत्रकारांना बोलावले. याप्रकरणी चंद्रकांत सूर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचा सकाळी साडेदहापासून व्हाट्सअॅपवरून संवाद झाला. यावेळी त्यांना नागपूरच्या एका क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. याशिवाय दुपारी १.३८ वाजता नागपूरच्या क्रमांकावरून संदेश आला, त्यात पत्रकारांना पाठवा’, असे नमूद करण्यात आले होते. तो दूरध्वनी कोणाचा आहे, त्याचे नाव आता आम्ही न्यायालयात सांगू शकत नाही. याशिवाय ५३० रुपये प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून गोळा केले गेले. जवळपास एक कोटी ८० लाख रुपये इतकी रक्कम आहे. या पैशांचे इतरही काही लाभार्थी असण्याची शक्यता असल्याचे घरत यांनी यावेळी न्यायालयाला सांगितले.
COMMENTS