युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्याची हेल्पलाइन

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्याची हेल्पलाइन

मुंबईः सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून  राज्यातील  अंदाजे १२०० विद्यार्थी युक्रेन देशात अडकले आहेत. त्याती

‘मतदानयंत्र नको मतपत्रिका हवी’
काँग्रेसला संरचनात्मक दुरुस्त्यांची गरज
विलुप्त ओमीद

मुंबईः सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून  राज्यातील  अंदाजे १२०० विद्यार्थी युक्रेन देशात अडकले आहेत. त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यांशी संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न  सुरू आहेत  अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीपत्रकार परिषदेत दिली.

वडेट्टीवार म्हणाले, युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील अंदाजे १२०० विद्यार्थी अडकले असून ३०० विद्यार्थ्यांनी पालकांशी संपर्क साधला असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे.युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर देखील संकलित करण्याचे काम सुरू आहे.सर्व जिल्हाधिकारी यांनी देखील हेल्पलाईन नंबर जाहीर केलेले आहेत.राज्याचा नियंत्रण कक्ष  022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल तसेच व्हॉट्स क्रमांक9321587143आणिcontrolroom@maharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा.

वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील किती लोक अडकले  आहेत याची माहिती विभाग घेत आहे.तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केले आहे. जी-जी मदत हवी असेल ती मदत देण्यासाठी राज्य सरकार  देण्यास तयार आहे.केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत.कदाचित युक्रेनमधून विमान उडू शकणार नाही. त्यामुळे बाजूच्या देशातून जर विमान घेतले तर त्यासाठी तयारी दर्शवली आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा स्तरावर संकलित करण्याची तयारी केली आहे. काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयानेनवी दिल्ली येथेहेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली येथील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

  • टोल फ्री – 1800118797
  • फोन 011-23012113 / 23014104 / 23017905
  • फॅक्स 011-23088124
  • ईमेलsituationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क

साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0