अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट मागे का घेतले

अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट मागे का घेतले

नवी दिल्ली : वंशवादाचे कट्‌टर समर्थक, एकेकाळचे व्हाइट हाऊसमधील मुख्य व्यूहरचनाकार आणि काश्मीर प्रश्नाबाबत एकदम चर्चेत आलेले स्टीव्ह बॅनन यांच्यासोबत स

अल-काइदाचा प्रमुख अल-जवाहिरी ठार
चीनचा विरोध असतानाही नॅन्सी पॅलोसी यांचा तैवान दौरा यशस्वी
ज्यो बायडन आणि सलमान मूठभेट कशासाठी?

नवी दिल्ली : वंशवादाचे कट्‌टर समर्थक, एकेकाळचे व्हाइट हाऊसमधील मुख्य व्यूहरचनाकार आणि काश्मीर प्रश्नाबाबत एकदम चर्चेत आलेले स्टीव्ह बॅनन यांच्यासोबत स्वत:चे छायाचित्र प्रसिद्ध करून एक वादग्रस्त ट्विट अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्त हर्ष श्रींगला यांनी बुधवारी ट्विटरवर प्रसिद्ध केले पण आठ तासांनंतर कोणतेही कारण न देता त्यांनी ते मागे घेतले.

या ट्विटमध्ये श्रींगला यांनी स्टीव्ह बॅनन यांच्यासोबतचे आपले छायाचित्र प्रसिद्ध करून त्यामध्ये भगवद्गगीतेचे सच्चे अनुयायी व ‘धर्म’ योद्धा स्टीव्ह बॅनन यांना भेटून आनंद झाला असे म्हटले होते. (“A pleasure to meet the legendary ideologue and ‘Dharma’ warrior @StephenBannon, an avid follower of the #Hindu epic the #BhagvadGita”.)

२०१७साली ‘द डिप्लोमॅट’ या वेबसाइटवर ‘स्टीव्ह बॅनन, धर्मा वॉरियर : हिंदू स्क्रिप्चर्स अँड द वर्ल्डव्ह्यू ऑफ ट्रम्प्स चीफ आयडोलॉग’ या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाचा मथळा श्रींगला यांनी आपल्या ट्विटमध्ये समाविष्ट केल्याचे लक्षात येते.

स्टीव्ह बॅनन यांच्याविषयीचे ट्विट मागे घेण्यामागे काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे व या विषयाचे आंतरराष्ट्रीयकरण होऊ लागले आहे ती कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

श्रींगला यांचे हे वादग्रस्त ट्विट आठ तास ट्विटरवर होते व पाकिस्तानच्या ते लक्षात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकताच न्यू यॉर्क टाइम्समध्ये ओपेडवर एक लेख लिहिला असून या लेखात त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना क्रुरकर्मा हिटलर व त्याच्या नाझी यंत्रणेशी केली होती. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या हाती वादग्रस्त मुद्दे जाऊ नये म्हणून ट्विट मागे घेतले.

काश्मीरमुळे वाद 

या ट्विटसंदर्भात ‘द वायर’ला मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात विविध विचारधारेंच्या मंडळींपर्यंत काश्मीर मुद्द्याबाबत भारताची भूमिका जावी व त्यातून पाकिस्तानची कोंडी व्हावी यासाठी भारताकडून मोठ्या प्रमाणावर मुत्सद्देगिरी सुरू आहे. या मुत्सद्देगिरीत स्टीव्ह बॅनन यांचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यावेळी बॅनन यांची भेट श्रींगला यांनी घेतली असावी.

श्रींगला यांनी ३ सप्टेंबर रोजी ३७० कलम रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाची माहिती देणारा १२ मिनिटांचा एक व्हिडिओ जाहीर केला होता. या व्हिडिओत सरकारच्या निर्णयानंतर अमेरिकेत व सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात दिशाभूल करणाऱ्या माहितीचा समाचार घेतला गेला होता.

अमेरिकेत काश्मीरप्रश्नावरून प्रश्न उपस्थित करणारे अनेक नेते आहेत. त्यांच्यापर्यंत योग्य माहिती जावी यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून भारतीय दुतावासातील अधिकारी अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाचे एक प्रबळ नेते बर्नी सँडर्स यांनाही भेटणार आहेत. बर्नी सँडर्स यांनी काश्मीरमधील संपर्कव्यवस्था बंद केल्याबद्दल टीका केली होती.

स्टीव्ह बॅनन एक वादग्रस्त व्यक्तिमत्व

वंशवादाचे कट्‌टर समर्थक असलेल्या स्टीव्ह बॅनन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून आणण्यात कळीची भूमिका बजावली होती. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर बॅनन यांना ट्रम्प प्रशासनात मुख्य व्यूहरचनाकार म्हणून भूमिका दिली होती. पण नंतर बॅनन यांच्या कट्‌टर उजव्या भूमिकेमुळे व व्हाइट हाऊस प्रशासनातील अन्य सहकाऱ्यांच्या दबावामुळे ट्रम्प यांनी बॅनन यांची पदावरून हकालपट्‌टी केली होती.

बॅनन यांचे नाव वादग्रस्त कंपनी केंब्रिज अनॅलॅटिकाशीही जोडले गेले होते. ते २०१४मध्ये या कंपनीचे उपाध्यक्षही होते. अब्जाधीश उद्योगती व कट्‌टर उजव्या विचारसरणीचे भांडवलादार रॉबर्ट मर्सर यांच्या केंब्रिज अनॅलॅटिका कंपनीने सोशल मीडियातील माहितीची छेडछाड करून ट्रम्प यांच्या विजयात व ब्रेक्झिट करारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी मर्सर यांच्या कंपनीची वृत्तवाहिनी ब्रेटबार्ट न्यूज याचे बॅनन हे प्रमुख होते.

२०१८मध्ये फेसबुक-केंब्रिज अनॅलॅटिका यांच्यातील साटेलोटे उघडकीस आल्याने बॅनन यांची एकूण कामगिरी उघड झाली होती. हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या क्रिस्तोफर वायली यांनी बॅनन यांना त्यांच्या मानसशास्त्रीय धुव्रीकरण व युद्ध कौशल्यामुळे ट्रम्प यांनी आपल्या प्रचारात घेतले होते असा खुलासा केला होता. २०१४मध्ये मोदी सत्तेत निवडून आल्यानंतर बॅनन यांनी मोदींचा विजय हा ‘क्रोनी कॅपिटिलिझम’च्या विरोधातला असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

एकूणात बॅनन यांच्याकडील सोशल मीडियातील मानसशास्त्रीय धुव्रीकरण व युद्ध कौशल्य पाहून अमेरिकेच्या प्रशासकीय वर्तुळात भारताची काश्मीरविषयक भूमिका मांडण्यासाठी हालचाली सुरू होत्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: