विज्ञान कॉंग्रेसमधील मूर्खपणा

विज्ञान कॉंग्रेसमधील मूर्खपणा

संघ परिवाराच्या विचारधारेला खतपाणी घालून पुराणमतवादी रचनेला आमंत्रण देऊ शकणार्‍या कोणत्याही व्यक्तीसाठी भाजप सरकारने बहुधा मैदान खुले केले आहे.

मोदी सरकार तुमच्यावर पाळत ठेवतंय का? मग हे पाच प्रश्न नक्की विचारा.
राहुल गांधींना जाहीर पत्र
गुजरातचे भूतपूर्व गृहमंत्री हरेन पंड्यांच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयने खरोखरच केला का?

परस्परसंबंध म्हणजे कार्यकारण भाव नव्हे –

भारताच्या  सत्ताधारी पक्षाने कुठल्याही परिणामांची तमा नं करता त्यांच्या अविवेकी वैज्ञानिक धारणा रूढ करण्यासाठी काही मूठभर लोकांना जणू बेलगाम सोडले आहे. या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणे अतिशय कठीण आहे. कोणत्याही प्रकारच्या अधिकारपदी विराजमान व्यक्तीला  अवैज्ञानिक , अनैतिहासिक बकवास करताना ऐकता तेव्हा तुम्हाला हसू येते आणि न रहावून तुम्ही ती व्यक्ती चुकीचे बोलत आहे याकडे लक्ष वेधता.

मग प्रधानमंत्री महोदयांवर कठोर टीका केली अथवा सामाजिक माध्यमांवर मंत्री, राजकारणी यांना उद्देशून टोकदार आणि गंभीर टीका केली म्हणून किंवा विशेष आक्षेपार्ह नसलेली टिप्पणी केली म्हणून लोकांना अटक करण्यात येत असल्याचे वृत्त तुमच्या वाचनात येते. किंचितश्या अपमानाला बिचकणाऱ्या, तर्क आणि नागरी स्वातंत्र्याचा विचार न कारणी विधानं मुक्तपणे करणाऱ्या कुलगुरू, न्यायमूर्ती आणि मंत्र्यांबद्दल तुम्ही वाचता.  मग तुम्ही समाज माध्यमांवर लिहिताना काळजी घेता.कारण समाज माध्यमांवरभटकणाऱ्या ट्रोल फौजा आहेत आणि ट्रोल सैनिकांना सामाजिक माध्यमांवर खुद्द प्रधानमंत्री फॉलो करतात हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही अश्या फौजेच्या नजरेतून दूर प्रयत्न करता. त्यासाठी वाक्यरचनेचे व्यसन असलेल्या एखाद्या  भाषाशास्त्रज्ञाप्रमाणे तुम्ही तुमच्या भाषेकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देता.

जेव्हा व्यासपीठावर उभे राहून कोणी काहीतरी मूर्ख बडबड करते, तेव्हा तुम्हाला तिथे एक चेहरा दिसत नाही.  भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये आंध्रविश्वविद्यापीठाचे कुलगुरू जी. एन. राव यांनी जेव्हा ‘स्टेम- सेल तंत्रज्ञान आणि टेस्ट-ट्यूब बेबी हे आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी होते’ असे व्यक्तव्य केले तेव्हा त्यांच्या छबीत तुम्हाला एक यंत्रणा दिसते. आणि तुम्हाला अनावर हसू येते. पण तुम्ही ते दाबता कारण ती यंत्रणा तुमच्याकडे रोखून बघत असते.

अर्थात, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या छत्रछायेतील संघटना यामागे कारणीभूत नाहीत कारण एकानंतर एक घडणाऱ्या या घटना काही त्यांनी रचलेल्या नाहीत. घडवून आणलेल्या नाहीत. तरतुम्हाला जाणवत असलेली गोष्ट म्हणजे निव्वळ योगायोग आहे! भाजपा, आरएसएस आणि त्यांच्या संलग्न संघटना आणि त्यांच्या विचारधारेशी निगडित घटना यांच्या इतका सहसंबंध कसा असे तुम्हाला वाटत असले तरी ती तुमच्या डोक्यातील एक कल्पना आहे.

कारण, तुम्ही एक उदारमतवादी, राष्ट्रविरोधी फुटकळ व्यक्ती आहात.

त्यामुळे तुमची नुसती मुस्कटदाबी होत नाही तर विरोधकांचीअदृश्य फौज तुम्हाला गाठते आणि तुम्हाला तुमच्या मतांचा पुनर्विचार करण्याचे आमंत्रण देते. राज्य विश्वविद्यापीठाच्या सर्वोच्च स्थानी  विराजमान असलेल्या जी.एन. राव यांनी जे विधान केले, ते त्यांनी का केले असावे?

उत्तर खूप सोपे आहे : ते मूर्ख आहेत. (“महाभारतात शंभर बीजांडे शंभर मातीच्या मडक्यांत संकरित करण्यात आलेली होती असे लिहलेले आहे” म्हणून आपल्याकडे स्टेम-सेल आणि आयव्हीएफ तंत्र होते असे त्यांचे म्हणणे आहे.) पण आपण त्यांना मूर्ख ठरवू शकत नाही, त्यामागे एखादी दुसरी बाब असली पाहिजे असा विचार करायला आपल्याला भाग पडले जाते.

आंध्रविश्वविद्यापीठाचे कुलगुरू जी. एन. राव

कदाचित रावांचे ते विधान रूपकात्मक असेल –  जणू एखाद्या किचकट विषयाचे रूपकात्मक स्पष्टीकरण असावे, ज्याचा अप्रत्यक्ष उल्लेख त्यांनी चित्रफितीमध्ये केला आहे. आणि हजारो वर्षांपूर्वी आपण एका हत्तीचे डोके एका मनुष्याच्या धडाला जोडले याचा अर्थ आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे असे  वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले तेव्हा ते कदाचित विनोद करण्याचा प्रयत्न करत होते. मोर संभोग करत नाहीत तर ते अश्रूंद्वारे प्रजनन करतात असे विधान राजस्थान उच्च न्यायालय न्यायाधीशांनी केले तेव्हा ते कदाचित आपली ‘भक्ती’ दर्शवत असावेत.माकडाचे मानवात रूपांतर झाले नाही कारण आपल्या आजी-आजोबांनी अशी गोष्ट सांगितली नाही असे सत्यपाल सिंघ म्हणाले, तेव्हा ते कदाचित वैज्ञानिक तत्त्वज्ञानाच्या नव्या अत्युच्च बिंदूवर असतील.E=mc2पेक्षा अधिक चांगले सिद्धांत वेदांमध्ये आहेतअसा विश्वास स्टीफन हॉकिंग यांना होता असे विधान हर्षवर्धन यांनी केले, तेव्हा ते कदाचित अज्ञात अज्ञानाचे मनन करत असतील.

जरा थांबा : धक्का बसतो. जेव्हा विज्ञान मंत्री हा विचार जाहीरपणे व्यक्त करतात आणि मर्यादा ओलांडतात तेव्हा मात्र ही गोष्ट रूपक राहत नाही.मग ते काय असतं?

तरभाजप सरकारने‘परिवारा’च्या विचारधारेला अनुरूप पुराणमतवादी रचनेला आमंत्रण देऊ शकेल, ज्यावरून लोकांमध्ये चर्चा घडवूनबातमी निर्माण करू शकेल अशाव्यक्तींसाठी बहुधा मैदान खुले केले आहे. मग अशी उत्कृष्ठ आखणी करणारा कुणी एक निवडला जातो आणि दैवी कृपेसाठीअमर चित्र कथेत वापरल्या जाणाऱ्या लाडक्या शब्दात सांगायचे झाले तर त्याला एक ‘वरदान’ दिले जाते. ज्यावेळी रात्री शबरीमाला मंदिरात दोन स्त्रियांनी प्रवेश केला त्यावेळी हे “सरकार-प्रेरित भ्याडपणाचे कृत्य होते” ही इस्त्रो प्रमुख माधवन नायर यांची टिप्पणी राष्ट्रवादी अभिव्यक्तीच्या श्रुंखलेतील एक घटक असल्याचे स्पष्ट होते.

सर्व काही शांतपणे सहन करणाऱ्या आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जनसमुदायाला बघून आपल्यापैकी अनेक जण अस्वस्थ होतात. या आक्षेपार्ह विधानांचे सामान्यीकरण होताना बघून निराश झालेल्या आपल्यामधल्या अनेकांना तुम्ही संशयखोर आहात असे सांगितले जाते. सार्वजनिक राजकारणाबाबत निराशा आणि त्याच्याशी कुठल्याही प्रकारे जोडलेले नसणे ही एक सोय असते. त्याचवेळी अशा ‘जागते’ नसलेल्या अवस्थेला जेव्हा सातत्याने योग्य ठरवले जाते, अलिप्ततेला सन्मानित केले जाते तेव्हा जे योग्य आहे त्यासाठी संघर्ष करणे थांबवून अनेकजण आहे त्या जगण्याशी सामावून घेण्याचा प्रयत्न करू लागतात. जगणं संकुचित करून घेतात. पण त्याचवेळी आपल्यापैकीच काहींना ते जमत नाही.

मग आपण वाट बघायला लागतो. सरकार कधीतरी एखाद्या उत्कृष्ट प्रमुख वैज्ञानिक सल्लागाराची नेमणूक करेल, आपण आशावादी राहण्याचा निर्णय घेतो. पण जेव्हा एका वरिष्ठ शैक्षणिक प्रशासकाला राष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेस ही एक चघळण्याची बाब वाटते, तेव्हा तुम्हाला तुमची हेटाळणी झाल्यासारखे वाटते. (आणि अशी ती एकटी व्यक्ती नाही.)

याच प्रकारे, यंत्रणेच्या केंद्रस्थानी असलेल्या पूर्ण अक्षमतेचा सामना टाळण्यासाठी जबरदस्तीने बनवलेल्या बहाण्यांच्याएका गुंतागुंतीच्या जाळ्यात आपण फिरत राहतो. प्रत्येक ठिकाणी परस्परसंबंध आपल्या लक्षात येतो तरीही आपण संशय न घेता, वातावरण गढूळ होत चालले आहे हे माहित असूनही आपण कारणे शोधायला लागतो.

मात्र, जेव्हा एक कुलगुरू विद्यार्थिनीला बोलावून “तू संशयखोर बनू नकोस, निराश होऊ नकोस म्हणजे तुला सारे काही चांगले दिसेल” असे बोलावून सांगतो तेव्हा तात्कालिक निर्णय हे दैनंदिन तर्कासाठी किती अपायकारक असतात याची जाणीव होते. पण संशयी बनलं पाहिजे. आणखी एक नोटबंदी किंवा उपासमारीतून होणारा मृत्यू टाळायचा असेल जे खटकतंय त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. मूर्ख विधानांमध्ये गर्भितार्थ शोधावा अशी अपेक्षा आहे. पण विचार करा, जी. एन. रावांच्या शब्दांचा विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल.  निराशावादी होऊ नका पण संशयी बना. प्रश्न विचारा आणि आशा बाळगायला शिका.

किंवा मग निराशावादी व्हा आणि तुमच्या आशा धुळीला मिळालेल्या बघण्याची तयारी ठेवा.

निराशावादी बनू नका : जगाच्या इतर भागात चांगले काम करणारे वैज्ञानिक आणि शिक्षक आहेत. निदान हे वास्तव तसेच राहील अशी आशा करूयात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0