कोची : भारतीय नौदलात पहिली महिला पायलट बनण्याचा मान सब लेफ्टनंट शिवांगी यांनी कमावला आहे. सोमवारी भारतीय नौदलातील प्रशिक्षण पूर्ण करून त्या पहिल्या मह
कोची : भारतीय नौदलात पहिली महिला पायलट बनण्याचा मान सब लेफ्टनंट शिवांगी यांनी कमावला आहे. सोमवारी भारतीय नौदलातील प्रशिक्षण पूर्ण करून त्या पहिल्या महिला पायलट म्हणून नौदलातील डॉर्नियर हे टेहळणी करणारे विमान चालवतील, असे नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
शिवांगी या मूळच्या बिहारमधील मुजफ्फरपूर येथील आहेत. सोमवारी नौदलात सामील झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवांगी यांनी माझे पायलट बनण्याचे स्वप्न होते ते मी पूर्ण केले असून त्याचा माझ्या आई-वडिलांना अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. पायलट होण्याचे स्वप्न हे मी कित्येक वर्षे मनाशी बाळगले होते. ते सत्यात उतरत असताना तो एक वेगळाच अनुभव जाणवत आहे तो शब्दांत सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी भारतीय नौदलात शिवांगी सामील झाल्या होत्या. आता त्या तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणास सज्ज झाल्या आहेत. भारतीय नौदलात महिला कार्यरत असल्या तरी त्यामध्ये पायलट म्हणून महिला कार्यरत नव्हत्या. मला ही संधी मिळाली अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय हवाईदलात एस. धामी या पहिल्या महिल्या पायलट म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यानंतरची ही दुसरी महत्त्वाची घटना आहे. एस. धामी या हिंडन येथील हवाईदलाच्या तळावर चेतक हेलिकॉप्टर युनिटच्या फ्लाइट कमांडर आहेत.
मूळ बातमी
COMMENTS