शेतकरी आंदोलनः शीख धर्मगुरुची आत्महत्या

शेतकरी आंदोलनः शीख धर्मगुरुची आत्महत्या

नवी दिल्लीः दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बुधवारी एक दुःखद घटना घडली. या आंदोलनात सहभागी असलेले एक धर्मगुरू संत बाबा राम सिंह (६५) य

दिल्ली पोलिसांनी गाझीपूरचे बॅरिकेड्स हटवले
‘शेतकरी आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी’
‘तुम्ही संपूर्ण शहराचा गळा घोटला’

नवी दिल्लीः दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बुधवारी एक दुःखद घटना घडली. या आंदोलनात सहभागी असलेले एक धर्मगुरू संत बाबा राम सिंह (६५) यांनी शेतकर्यांचे दुःख पाहावत नसल्याचे कारण देत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. संत बाबा राम सिंह गेली २० दिवस आंदोलनात सहभागी होते. ते कर्नाल येथील रहिवासी होते. नानकसार सिंग्रा वाले म्हणून ते ओळखले जात होते. तेथील एका गुरुद्वाराचे ते प्रमुख होते. त्यांचा मृतदेह कर्नाल येथे पाठवण्यात आला आहे. संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येमुळे शेतकरी संघटनांमध्ये संताप उसळला असून विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका केली आहे.

संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिली होती. या चिठ्ठीत त्यांनी मला शेतकर्यांचे दैन्य पाहावत नाही. सरकार शेतकर्यांना न्याय देत नाही. अन्याय करणे हे पाप आहे पण अन्याय सहन करणे हेही पाप आहे. शेतकर्यांच्या हक्कासाठी कोणी पुरस्कार सरकारला परत केले तर कोणी रस्त्यावर उतरले आहेत, मी शेतकर्यावरच्या होत असलेल्या अन्यायावर स्वतःचा जीव घेत आहे, असा मजकूर आहे.

गेल्या महिन्यापासून दिल्लीच्या वेशीवर पंजाब व हरयाणातून हजारो शेतकरी ठाण मांडून बसले आहे. प्रचंड थंडी असूनही शेतकर्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झालेला नाही. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर मंगळवारपर्यंत २० हून अधिक शेतकर्यांचे प्राण गेले असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0