लॉकडाऊनच्या काळात आत्महत्येच्या संख्येत वाढ

लॉकडाऊनच्या काळात आत्महत्येच्या संख्येत वाढ

नवी दिल्लीः कोविड-१९ मुळे भारतात पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात आत्महत्येच्या प्रवृत्तीत ६७.७ टक्क्यांनी वाढ झाल्याचा एक संशोधन अहवाल इंटरनॅशनल जर्नल ऑ

दिल्ली जहांगीरपुरी दंगलप्रकरणी विहिंप, बजरंग दलावर गुन्हे दाखल
विळखा ड्रॅगनच्या बँकेचा
हॉस्टेल फी वाढीच्या विरोधात ‘जेएनयू’त विद्यार्थ्यांचे आंदोलन

नवी दिल्लीः कोविड-१९ मुळे भारतात पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात आत्महत्येच्या प्रवृत्तीत ६७.७ टक्क्यांनी वाढ झाल्याचा एक संशोधन अहवाल इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टिम या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

‘अनॅलॅसिस ऑफ न्यूज मीडिया रिपोर्ट ऑफ सुसाईड अँड अटेंम्टेड सुसाईड्स ड्युरिंग द कोविड-19 ल़ॉकडाऊन इन इंडिया’ अशा शीर्षकाच्या अहवालात देशभरात ३६९ आत्महत्येच्या घटना व आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत, असे या नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्महत्यांच्या घटना, प्रयत्न व प्रकारातही लॉकडाऊनच्या काळात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गळफास लावून आत्महत्यांचे प्रकार ४२ टक्के होते त्यात वाढ होऊन ते ६४.४ टक्के झाले आहेत. पण विषप्राशन व रेल्वे खाली उडी मारून आत्महत्यांच्या घटना व प्रयत्न कमी झाले आहेत. विषप्राशनाच्या घटना गेल्या वर्षी २१.५ टक्के होत्या तर यंदा त्या ८.५ टक्के असून रेल्वेखाली उडी मारून आत्महत्यांची गेल्या वर्षी टक्केवारी ९.४ टक्के होती यंदा ती २ टक्के इतकी झाली आहे.

पण फास लावून घेणे, उंच ठिकाणीवरून स्वतःला झोकून देणे या आत्महत्याच्या घटना व प्रयत्न यांची आकडेवारी विषप्राशन व रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या व तसे प्रयत्न यांच्यापेक्षा कमी आहेत.

या संशोधन अभ्यासात काही राज्ये व तेथील आत्महत्या यांच्यावरही प्रकाश पडला आहे. बिहारमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत लॉकडाऊनच्या काळात ७ टक्क्यांनी आत्महत्या वाढल्या आहेत.

अन्य आत्महत्या प्रकारामध्ये लॉकडाऊनच्या काळात दारु पिऊन आत्महत्यांची संख्या ३९ इतकी तर तसे प्रयत्न ९ होते. गेल्या वर्षी हा आकडा शून्य होता. लॉकडाऊन पुकारल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात ३९ पैकी ३४ आत्महत्या झाल्या होत्या. या काळात मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0