सनी देओल यांचा निवडणूक खर्च नियमबाह्य

सनी देओल यांचा निवडणूक खर्च नियमबाह्य

चंदीगड : बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार सनी देओल यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांत अति

लोकपालला स्वत:चे कार्यालय नाही
एसपी-डीआयजी पदांना केंद्रात प्रतिनियुक्ती सक्तीची
पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून पर्रिकरांच्या स्मारकाची तयारी

चंदीगड : बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार सनी देओल यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांत अतिरिक्त पैसे खर्च केल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला लोकसभा निवडणुकांसाठी ७० लाख रु. प्रचार खर्च मंजूर केला आहे. पण सनी देओल यांनी ७० लाख रु.हून अधिक खर्च केल्याचे निष्पन्न आले असून तसा अहवाल जिल्हा निवडणूक केंद्राकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालाच्या विरोधात सनी देओल दाद मागू शकतात.

सनी देओल यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ७८,५१,५९२ रुपये खर्च केले आहेत आणि ही रक्कम ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा ८ लाख ५१ हजार रु.हून अधिक असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सनी देओल यांच्याकडून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांनी ६१,३६,०५८ रुपये खर्च केले आहेत. जाखड हे ८२,४५९ मतांनी हरले होते.

संपूर्ण देशात सनी देओल हे असे एकमेव उमेदवार आहेत की, ज्यांचा निवडणूक खर्च नियमबाह्य झालेला आहे.

गेल्या आठवड्यात सनी देओल यांनी आपल्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचे कामकाज व बैठकांची जबाबदारी आपल्या एका प्रतिनिधीला दिल्याने बराच गदारोळ उडाला होता.

मू‌‌ळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0