राज्याच्या सत्तासंघर्षावर पुढची तारीख

राज्याच्या सत्तासंघर्षावर पुढची तारीख

दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात २७ सप्टेंबरला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या न

‘सरकारला इगो महत्त्वाचा’शेतकऱ्यांचा आरोप
भटके विमुक्त आणि सीएए
धोनीच्या निवृत्तीमागचे रहस्य काय?

दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात २७ सप्टेंबरला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वाखालील ५ न्यायाधीशांच्या घटना पीठासमोर आज याचिका आली असता, न्या. चंद्रचूड यांनी हा निर्णय दिला.

निवडणूक आयोगासमोर शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत कार्यवाही सुरू होती. आयोगाने शिवसेनेला आपली बाजू मांडण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र एकनाथ शिंदे गटाने या याचिकांवर सुनावणी लवकर घ्यावी, अशी मागणी ६ सप्टेंबरला केली होती. त्यानुसार आज त्यावर सुनावणी घेण्यात आली.

नीरज किशन कौल, यांनी एकनाथ शिंदे गटातर्फे युक्तिवाद केला. कपील सिब्बल यांनी शिवसेनेतर्फे युक्तीवाद केला. या पीठासमोर सुरू असणाऱ्या कार्यवाहीचा आणि निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीचा काही संबंध नाही, त्यामुळे निवडणूक आयोगाला कामकाज करू द्यावे, असा युक्तीवाद नीरजकिशन कौल यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने या विषयावर पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला करण्याचा निर्णय दिला.

निवडणूक चिन्ह गोठवावे, अशी मागणी यावेळी एकनाथ शिंदे गटातर्फे कौल यांनी केली. मात्र अगोदर आमदार आपत्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे अभिषेक मनू शिंघवी यांनी केली.

२० जुनला महाराष्ट्रातील हा सत्ता संघर्ष सुरू झाला. शेवटची सुनावणी २३ ऑगस्टला झाली होती. तोपर्यंत कोणताही निर्णय न्यायलयाने दिलेला नव्हता. केवळ निवडणूक आयोगाने कोणतीही मोठी कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0