‘संपूर्ण देशावर परिणाम होईल’

‘संपूर्ण देशावर परिणाम होईल’

नवी दिल्लीः दिल्ली दंगल प्रकरणात गुरुवारी देवांगना कलिता, नताशा नरवाल व आसिफ इक्बाल या तीन विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्य

नताशा, देवांगना, आसिफ अखेर तुरुंगाबाहेर
देवांगना, नताशा, आसिफला जामीन
देवांगना कलिताचा जामीन फेटाळला

नवी दिल्लीः दिल्ली दंगल प्रकरणात गुरुवारी देवांगना कलिता, नताशा नरवाल व आसिफ इक्बाल या तीन विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली जात आहेत. या तीन विद्यार्थ्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द व्हावा अशी याचिका दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत या प्रकरणात तीन विद्यार्थ्यांची सुटका झाल्याने त्याचे परिणाम देशव्यापी पडतील. हे प्रकरण महत्त्वाचे असून यासंदर्भात आम्ही नोटीस जारी करणार असल्याचे सांगितले. न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाची समीक्षा करू असेही स्पष्ट करत तीन विद्यार्थ्यांना नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता १९ जुलैला होणार आहे.

दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाने या तिघा विद्यार्थ्यांना दिल्ली दंगल प्रकरणात जामीन दिला आहे पण या आदेशातून असे प्रतीत होत आहे की, या तिघांना निर्दोषत्व मिळाले आहे. वास्तविक दिल्ली दंगलीत ५३ जण मरण पावले असून ७०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यात अनेक पोलिसही आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने दंग्यांवर नियंत्रण आणण्यासाठी यूएपीए कायदा लागू होत नाही असे मत मांडले आहे. पण आरोपींचा गुन्हा हा गंभीर मानला जाऊ नये? त्यामुळे हा जामीन आदेश रद्द करण्याची गरज आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: