सुशांत प्रकरणः फेक ट्विट ; ‘आज तक’ला दंड

सुशांत प्रकरणः फेक ट्विट ; ‘आज तक’ला दंड

नवी दिल्लीः बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचे वृत्तांकन करताना बनावट ट्विट करत प्रसार माध्यमांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रक

रेड लाइट एरियातला हुंदका
जॉर्ज ऑरवेलच्या श्रेष्ठत्वाचा मर्मभेद
महाभियोग आरोपांमधून ट्रम्प मुक्त

नवी दिल्लीः बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचे वृत्तांकन करताना बनावट ट्विट करत प्रसार माध्यमांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अथॉरिटी (एनबीएसए)ने ‘आज तक’वर १ लाख रु.चा दंड लावला आहे. तर ‘झी न्यूज’, ‘न्यूज-24’, ‘इंडिया टीव्ही’ या वाहिन्यांनी माफी नामा द्यावेत असे आदेश दिले आहेत.

सुशांत सिंह यांच्या आत्महत्येचे वृत्तांकन करताना या सर्व वाहिन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत, एनबीएसएने म्हटले आहे की, बातम्या देणे हे वृत्तवाहिन्यांचे काम आहे व व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून ते दिले जावे. त्यातून पीडिताला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. पण सुशांत सिंह आत्महत्येची बातमी देताना त्याच्या कुटुंबाच्या खासगीपणाचे उल्लंघन केले व सनसनाटी पसरेल असे वृत्तांकन करण्यात आले.

एनबीएसए ही एक नियामक संस्था असून ती वृत्तवाहिन्यांचे प्रसारण, आचार संहिता व मार्गदर्शक तत्वे लागू करत असते. या नियामक संस्थेत ७० वाहिन्यांचे प्रतिनिधित्व करणारे २७ सदस्य आहेत.

या संस्थेचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. सिकरी आहेत.

‘आज तक’ने सुशांतचा मृत्यू ‘हिट विकेट’ अशी टॅग लाइनद्वारे ट्विट केला होता. जी व्यक्ती या जगात नाही, त्यांना प्रश्न केला जात आहे, असे टॅगलाइन्स दुर्दैवी व प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे, असे एनबीएसएचे म्हणणे आहे.

‘इंडिया टीव्ही’ व ‘आज तक’ ने सुशांतचा मृतदेह दाखवून नियमांचे गंभीर उल्लंघन केले आहे, त्यावर माफी मागावी असेही एनबीएसएचे म्हणणे आहे.

‘झी न्यूज’ व ‘न्यूज-24’ यांनाही टॅगलाइन्स द्वारे कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल माफी मागण्याचे आदेश एनबीएसएने दिले आहेत.

सुशांतचा मृतदेह दाखवू नये असा इशारा ‘न्यूज नेशन’ला पूर्वी दिला होता. पण तरीही या वाहिनीने ते दाखवले. तर ‘एबीपी माझा’ने या अभिनेत्याच्या मृतदेहाचे क्लोज शॉट दाखवले नाही म्हणून त्यांना समज दिली आहे. ‘एबीपी’च्या वार्ताहरने सुशांतच्या बहिणीची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला तर ‘आज तक’च्या एका वार्ताहरने सुशांतच्या घरात जाऊन त्याच्या वडिलांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना या कृत्याबद्दल समज दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: