सुशांत सिंह, साना गांगुली, फरहान बोलले; सौरभ, सेहवागचे मौन,  मराठी चित्रपटसृष्टी थंड

सुशांत सिंह, साना गांगुली, फरहान बोलले; सौरभ, सेहवागचे मौन, मराठी चित्रपटसृष्टी थंड

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील पोलिस दडपशाहीविरोधात मत मांडल्यामुळे प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह याचा ‘सावधान इंडिया’ या गुन्हेमाल

‘एनआरसी’ : जर्मनीतील राईश नागरिकत्व कायद्यासारखा
दंतकथेतील राजाने केला प्राक्तनाचा स्वीकार!
१० जणांच्या पोटात पिगॅससचे गुपित

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील पोलिस दडपशाहीविरोधात मत मांडल्यामुळे प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह याचा ‘सावधान इंडिया’ या गुन्हेमालिकेचा करार रद्द करण्यात आला आहे. सत्य बोलण्याची किंमत चुकवावी लागली का असा प्रश्न एकाने विचारल्यावर सुशांत सिंह याने, ‘हो मित्रा, ही किंमत अत्यंत कमी होती. भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांना काय उत्तर देणार? असा सवाल त्याने ट्विटद्वारे केला आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत सुशांत सिंह याने, मी माझी कला विकतोय सद्सद्विवेक नाही असे उत्तर दिले. जेव्हा माझी मुले मोठी होतील आणि ते मला विचारतील की या देशात विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले तेव्हा तुम्ही काय करत होता, तेव्हा देण्यासाठी माझ्याकडे उत्तर हवे..म्हणून मी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहिलो असे तो म्हणालो.

‘सावधान’ मालिका निर्मात्यांनी करार रद्द करण्यामागचे कारण मला सांगितले नाही पण त्यांची कृती माझ्या जामिया प्रकरणावरच्या प्रतिक्रियेवर होती असे त्याने सांगितले. माझ्या कृतीचा मला अजिबात खेद वाटत नाही असेही त्याने स्पष्टपणे सांगितले.

सौरव गांगुलीच्या मुलीनेही व्यक्त केली प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची १८ वर्षाची मुलगी साना गांगुली हिनेही इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंह यांच्या ‘द एंड ऑफ इंडिया’ या पुस्तकातील “Every fascist regime needs communities and groups it can demonize in order to thrive. It starts with one group or two. But it never ends there. A movement built on hate can only sustain itself by continually creating fear and strife.

“Those of us today who feel secure because we are not Muslims or Christians are living in a fool’s paradise. The Sangh is already targeting the Leftist historians and “Westernized” youth. Tomorrow it will turn its hate on women who wear skirts, people who eat meat, drink liquor, watch foreign films, don’t go on annual pilgrimages to temples, use toothpaste instead of danth manjan, prefer allopathic doctors to vaids, kiss or shake hands in greeting instead of shouting ‘Jai Shri Ram’. No one is safe. We must realize this if we hope to keep India alive,”

हा उतारा टाकला आहे.

महत्त्वाची बाब अशी की या विषयावर खुद्ध सौरभ गांगुली यांनी आपले मत व्यक्त केलेले नाही. क्रिकेट विश्वातील इरफान पठाणसोडून जवळपास बहुतेक खेळाडूंना या विषयावर आपले मत व्यक्त करण्याचे टाळले आहे.

जामिया मिलियात माजी क्रिकेटपटून वीरेंद्र सेहवाग याने शिक्षण घेतले होते पण त्यानेही या विषयावर मौन पाळले आहे.

फरहानसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केली जामियावर प्रतिक्रिया

केवळ सुशांत सिंहच नव्हे तर स्वरा भास्कर, अनुराग कश्यप, रिचा चढ्‌ढा, झीशान अयुब, अनुभव सिन्हा, फरहान अख्तर, राधिका आपटे, परिणिती चोप्रा, तापसी पन्नू यांनीही विद्यार्थ्यांवरच्या पोलिस दडपशाहीविरोधात मत व्यक्त केले आहे.

अनुभव सिन्हा म्हणाले, ज्यांना जे काही घडलेय ते चुक वाटलं ते बोलले. ज्यांना वाटलं नाही ते गप्प आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता फरहान अख्तर याने आपल्या ट्विटद्वारे आता ट्विटरद्वारे मत मांडण्यापेक्षा रस्त्यावर येऊन बोलले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. त्याने १९ डिसेंबरला मुंबई ऑगस्ट क्रांती मैदानावर होणाऱ्या आंदोलनातही सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

दक्षिणेत कमल हसन, सिद्धार्थ रस्त्यावर

दक्षिणेतील सुपरस्टार कमल हसन यांनीही जामिया मिलियातील पोलिस दडपशाहीचा निषेध केला आहे. ते मद्रास विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी, मी स्वत:ला विद्यार्थी समजतोय मी या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या आवाजात माझा आवाज मिसळण्यासाठी आलोय, असे ते म्हणाले. हा देश हुकुमशाहीकडे निघाला आहे असेही विधान त्यांनी केले.

आणखी एक सुपरस्टार सिद्धार्थनेही ‘भारत बचावो’चा हवाला देत फॅसिस्ट शक्तींपासून दूर राहावे लागेल असा सल्ला देणारे ट्विट केले आहे. या देशातल्या फॅसिस्ट शक्ती पहिले मुसलमान, नंतर ख्रिश्चन, नंतर अन्य धर्मांना नष्ट करतील. नंतर ते दलितांना बाजूला करतील. पुढे स्त्रियांचे अधिकार काढून घेतील. हे लोक नेहमी फुटीचा, द्वेषाचा रस्ता शोधतील. हेच त्यांचे कार्य आहे. फॅसिस्टांना दूर करा, भारत वाचवा, असे ट्विट त्याने केले आहे.

देशभर विविध स्तरातून कलावंत, विचारवंत आपली मते व्यक्त करत असताना मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, टीव्ही अभिनेत्यांकडून जामिया मिलिया विद्यापीठातील पोलिसांच्या दडपशाहीविरोधात एकही प्रतिक्रिया उमटलेली नाही. अपवाद रेणुका शहाणे यांचा…

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0