स्वीडनचा लॉकडाऊनला नकार, समाजावर जबाबदारी

स्वीडनचा लॉकडाऊनला नकार, समाजावर जबाबदारी

युरोपमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन पुकारला असताना स्वीडन हा एकमेव देश आहे, ज्याने अद्याप लॉकडाऊनच्या दृष्टीने पावलेही

६ दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई कोविड मॉडेलः अशक्य ते शक्य करता सायास…
कोरोनाचा पुनःसंक्रमणाचा धोकाः आयसीएमआर

युरोपमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन पुकारला असताना स्वीडन हा एकमेव देश आहे, ज्याने अद्याप लॉकडाऊनच्या दृष्टीने पावलेही उचललेली नाहीत. या देशात या घडीला सर्वत्र रेस्तराँ, बार उघडे आहेत. शाळा, क्रीडांगणांमध्ये अद्याप मुले जात असून सरकारने लॉकडाऊन पुकारण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने खबरदारीची पावले उचलावीत असे आवाहन केले आहे.

मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाऊन न पुकारल्यामुळे स्वीडनवर जोरदार टीका केली होती. स्वीडनची मानसिकता कळपासारखी असून त्याचा स्वीडनला मोठा फटका बसेल असे वक्तव्य त्यांनी केले होते. पण ट्रम्प यांच्या व आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या इशार्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष करत स्वीडनच्या प्रशासनाने त्यांना योग्य वाटते ती धोरणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी स्वीडनच्या परराष्ट्रमंत्री अन लिंड यांनी ट्रम्प यांचे ‘कळप’ विधान चूक आहे असे सांगत लॉकडाउनपेक्षा आम्हाला आमच्या नागरिकांवर विश्वास असून ते जबाबदारीने वागतील यावर आम्ही ठाम आहोत असे विधान केले.

स्विडनमधील एका रेस्टॉरंट बाहेरील दृश्य(AP Photo/Andres Kudacki)

स्विडनमधील एका रेस्टॉरंट बाहेरील दृश्य(AP Photo/Andres Kudacki)

स्वीडनचे साथरोग मंत्र्यांनीही ट्रम्प यांच्या विधानाचा समाचार घेतला. आम्ही योग्य दिशेने जात आहोत, असे ते सीएनएनशी बोलताना म्हणाले. आमची आरोग्य व्यवस्था कोरोना साथ सांभाळण्याएवढी सक्षम आहे आणि सध्याची परिस्थिती वाईट नाही, असे ते म्हणाले.

९ एप्रिलला स्वीडनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या ९,१४१ रुग्ण होते तर या साथीने मरण पावलेल्यांची संख्या ७९३ इतकी होती.

स्वीडनच्या सरकारचा भर कोणत्याही नागरिकावर सक्ती करण्याचा नाही. सरकारने १४ मार्चला लॉकडाऊन पुकारला होता पण त्यानंतर दोन दिवसांनी सरकारने नागरिकांना हात धुण्याचे व आजारी असल्यास घरी विश्रांती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

२४ मार्चला सरकारने नवे नियम आणून रेस्तराँमध्ये अनावश्यक गर्दी करू नये, असे सांगितले. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. आम्हाला शाळा बंद करणे योग्य वाटत नाही कारण त्यामुळे अनेक मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल, घरात पालकांना इतका वेळ राहता येणे शक्य नाही पर्यायाने त्याचा आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होईल असे साथरोग मंत्र्यांचे म्हणणे आहे.

पण एलिझाबेथ लिंडेन या पत्रकारांने स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये नागरिक सामाजिक विलगीकरण पाळत असल्याचे व सबवेमध्ये प्रचंड गर्दी दिसत नसल्याचे सीएनएनला सांगितले. नागरिक सामाजिक विलगीकरणाबाबत जबाबदारीने वागत आहे, अनेक जोडपी एकमेकांचे चुंबन घेत असल्याची दृष्ये दिसत नाही व ईस्टरच्या पार्ट्याही झाल्याचे दिसून आले नाही, असे त्यांचे मत आहे.

वृद्धांना जपण्याकडे कल

स्वीडनमध्ये ७० व त्याहून अधिक वय असलेल्या वृद्धांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे, त्यांनी एकमेकांशी मिसळून राहू नये व हा वर्ग बाहेर पडू नये याची खबरदारी संबंधित कुटुंबांकडून घेतली जात आहे.

आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना साशंक

स्वीडनच्या या एकूण भूमिकेवर आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना साशंक आहे. स्वीडनमध्ये कोरोनाचे काही रुग्ण सापडले त्यावर सरकारने लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे. स्वीडनने आपली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम केली पाहिजे. विलगीकरण पाळले पाहिजे, असे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी सामाजिक प्रयत्नांची गरज आहे, यावरही आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना भर देत आहे.

इम्पिरियल कॉलेज लंडननुसार २८ मार्चपर्यंत स्वीडनच्या एकूण लोकसंख्येतील ३.१ टक्के लोकसंख्येला कोरोनाची बाधा झाली असून नॉर्वेमध्ये हे प्रमाण ०.४१ तर ब्रिटनमध्ये २.५ टक्के इतके आहे.

८ एप्रिलला स्वीडनमध्ये दर १० लाख लोकसंख्येमध्ये ६७ व्यक्तींचा मृत्यू झाला. हे प्रमाण नॉर्वेमध्ये १९ तर फिनलंडमध्ये ७ होते. पण गेल्या बुधवारी स्वीडनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकडेवारीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मृतांचा वाढता आकडा पाहून काही स्वीडिश संशोधकांनी प्रशासनाने कडक पावले उचलायला हवीत असे सरकारला सांगितले आहे. तर अनेक क्लिनिकनी रेस्तराँ, बार, शॉपिंग मॉल, स्की येथे नागरिकांची गर्दी वाढत आहे, त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असे सरकारला सांगितले आहे. कारोलिन्सका इन्स्टिट्यूटने एक विनंती पत्र सरकारला पाठवले असून त्यात त्यांनी सद्य परिस्थिती भयावह असून आपण कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकणार नाही, अशी भीती व्यक्त केली आहे.

स्टॉकहोम विद्यापीठातील गणिताचे प्रा. टॉम ब्रिटन यांनी येत्या एप्रिल अखेर स्टॉकहोममधील सुमारे ४० टक्के लोकसंख्येला कोरोनाची बाधा झाली असेल असा इशारा दिला आहे.

स्वीडनची आरोग्य यंत्रणा वादळांचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. पण कोरोनाशी करेल असे वाटत नाही असे काहींचे म्हणणे आहे.

सध्या स्वीडनमधील ४० टक्के कर्मचारी वर्ग घरातून काम करतो पण कोरोना येण्याअगोदर स्वीडनमध्ये अन्य देशांच्या तुलनेत घरातून काम करणार्यांची संख्या अधिक आहे.

एकूणात पुढील महिन्यात स्वीडनची सद्याची धोरणे कोरोना रोखण्यास किती सक्षम आहेत हे कळणार आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0