मोहम्मद अखुंड अफगाणिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

मोहम्मद अखुंड अफगाणिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

तालिबानने मंगळवारी अफगाणिस्तानमधील नव्या काळजीवाहू सरकारची घोषणा केली. त्या नुसार मोहम्मद हसन अखुंड हे सरकारचे नेतृत्व करतील तर तालिबानचे एक प्रमुख ने

गुंतागुंतीचा बलुचिस्तान
अफगाणिस्तानातून सप्टेंबरपर्यंत अमेरिकेच्या सैन्याची माघार
तालिबानला पाठिंबा द्यावा की नाही; भारतापुढे पेच

तालिबानने मंगळवारी अफगाणिस्तानमधील नव्या काळजीवाहू सरकारची घोषणा केली. त्या नुसार मोहम्मद हसन अखुंड हे सरकारचे नेतृत्व करतील तर तालिबानचे एक प्रमुख नेते अब्दुल घनी बरादार हे अफगाणिस्तानचे नवे उपप्रमुख असतील. हक्कानी गटाचे प्रमुख सिराजउद्दीन हक्कानी हे अंतर्गत मंत्री म्हणून काम पाहतील, तर अफगाणिस्तानचे नवे संरक्षणमंत्री तालिबानचे संस्थापक मुल्ला ओमर यांचा मुलगा मुल्लाह मोहम्मद याकूब हे पदभार स्वीकारतील, असे तालिबानने जाहीर केले. त्याच बरोबर हिदायतुल्ला बद्री हे देशाचे अर्थमंत्री असतील, असे सांगितले.

सीएनएनने अफगाणिस्तानातील नवे सरकार अमेरिकेच्या पाठिंब्यावर तयार झाल्याचे म्हटले आहे. हे सर्व नेते पूर्वी दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेले कट्टरवादी आहेत, असे सीएनएनने म्हटले आहे.

अल-जझिराच्या वृत्तानुसार अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये सर्व नेते हे ज्येष्ठ असून अफगाणिस्तानच्या राजकारणात या नेत्यांचा तीन दशकांहून अधिक वावर आहे.

नव्या सरकारमध्ये पश्तुन समुदायाची संख्या अधिक आहे. ताजिक सारख्या अल्पसंख्यांकांच्या समावेशाबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. अफगाणिस्तानमध्ये अनेक अल्पसंख्याक समुदायही असून देशातल्या सर्व घटकांचे मिळून सरकार असेल असे तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसांनी सांगितले होते.

सध्याचे सरकार काळजीवाहू स्वरुपाचे असेल. या सरकारच्या माध्यमातून देशाची घडी नीट बसवण्याचे प्रयत्न केले जातील, असे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले.

छायाचित्र – सईद खान एएफपी, अल जझिरा.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: