अफगाणिस्तान आता ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’

अफगाणिस्तान आता ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’

अफगाणिस्तानचा कारभार हा तालिबानने ताब्यात घेतलेल्या परिषदांमार्फत चालणार असून देशाची सूत्रे हैबातुल्ला अखुंडझदा यांच्या हाती असतील असे एका वरिष्ठ तालि

मुल्ला ओमरचे युद्धग्रस्त जग
बायडन यांच्या निर्णयामुळे अफगाणिस्तान देशोधडीला
तालिबानची स्त्रियांच्या अभिनयावर बंदी

अफगाणिस्तानचा कारभार हा तालिबानने ताब्यात घेतलेल्या परिषदांमार्फत चालणार असून देशाची सूत्रे हैबातुल्ला अखुंडझदा यांच्या हाती असतील असे एका वरिष्ठ तालिबान नेत्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान गुरुवारी तालिबानचे प्रवक्ते झाबिउल्लाह मुजाहिद यांनी अफगाणिस्तान आता इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान नावाने ओळखले जाईल याची घोषणा केली. त्यांनी तसे एक ट्विट केले आहे. गुरुवारी अफगाणिस्तानचा १०२वा स्वातंत्र्य दिवस होता. त्या निमित्ताने त्यांनी हे ट्विट पश्तू भाषेमध्ये केले आहे.

अखुंडझदा हे यांच्या नेतृत्वाखाली परिषद काम पाहील, त्यांच्या खाली असलेले उपप्रमुख अफगाणिस्तानचे राष्ट्रपती म्हणून काम पाहतील अशी माहिती वाहिदुल्लाह हाशिमी यांनी एका मुलाखतीत रॉयटर्सला दिली आहे. हाशिमी हे नव्या सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सामील आहेत. नवी राजवट स्थापन होत असताना अफगाण लष्करातील प्रत्येक सैनिकाला माफी देण्यात येईल, निवृत्त अफगाण सैनिकांची देशबांधणीत मदत घेतली जाईल, असे हाशिमी यांनी सांगितले.

अखुंडझदा हे देशाचे सर्वोच्च नेते असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली मुल्लाह याकूब (मुल्ला ओमरचे पुत्र), सिराजउद्दीन हक्कानी (हक्कानी संघटनेचे प्रमुख नेते) व अब्दुल घानी बरादार (दोहामधील बैठकांमध्ये तालिबानचे नेतृत्व करणारे) असे तिघे उपप्रमुख म्हणून काम पाहतील असे हाशिमी यांचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानात लोकशाही व्यवस्था नसल्याने ती प्रस्थापित करण्याचा प्रश्नच येत नाही, देशात शरीया कायदाच प्रस्थापित केला जाईल. देशाच्या हितासाठी अनेक निर्णय लवकर घेतले जातील. देशाचे स्वतःचे एक सैन्य दल असेल त्यात सध्या कार्यरत असणार्यांना सामावून घेण्यात येईल व सैन्य दलात सुधारणा आणल्या जातील, असे हाशिमी यांनी सांगितले.

(वृत्त छायाचित्र साभार डॉन )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: