कंदहार, हेरातमधील भारतीय दुतावासांवर तालिबानचे हल्ले

कंदहार, हेरातमधील भारतीय दुतावासांवर तालिबानचे हल्ले

नवी दिल्लीः अफगाणिस्तानातील कंदहार व हेरात या दोन शहरातील भारतीय वकिलातीत तालिबानने तोडफोड करत प्रवेश केला व तेथील कागदपत्रे हस्तगत केली आहेत. तालिबान

तालिबानने अफगाणिस्तानातील गझनीही बळकावले
तालिबानला पाठिंबा द्यावा की नाही; भारतापुढे पेच
अफगाण शांतता चर्चेत शस्त्रसंधी, महिला हक्कांवर भर

नवी दिल्लीः अफगाणिस्तानातील कंदहार व हेरात या दोन शहरातील भारतीय वकिलातीत तालिबानने तोडफोड करत प्रवेश केला व तेथील कागदपत्रे हस्तगत केली आहेत. तालिबानने भारतीय वकिलातीतील काही कारही नेल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. तालिबानकडून असे कृत्य होणे अपेक्षित होते, असे एका वरिष्ठ अधिकार्याचे मत आहे.

भारताच्या जलालाबाद व काबूल वकिलातीत काय झाले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

तालिबानचे आगेकूच होत असल्याचे लक्षात आल्यानंतर भारताने या अगोदरच अफगाणिस्तानातील वकिलाती मोकळ्या केल्या आहेत व वकिलातातील कर्मचारी वर्ग व भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.

दोन दिवसांपूर्वी भारताने आपल्या वकिलाती खाली करू नये असे आपली भूमिका असल्याचे तालिबानने म्हटले होते. त्या नंतर लगेचच ही घटना घडली आहे.

दरम्यान तालिबानने पूर्वीच्या सरकारमध्ये काम करणार्या अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या घराघरात घुसून चौकशी सुरू केल्याचीही वृत्ते पुढे येत आहेत. चौकशीत तालिबान राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांत काम करणारे, नॅशनल डायरेक्टोरेट ऑफ सिक्युरिटीमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना लक्ष्य करत आहेत. फ्रान्सची वृत्तसंस्था एएफपीनुसार अमेरिका व नाटोसोबत काम करणार्यांची चौकशी व माहिती काढण्याचे काम तालिबानने सुरू केल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका गोपनीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत कोणाविरोधातही सूडाची कारवाई केली जाणार नाही, घराघरात घुसून चौकशी केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र तालिबानने मागील सरकारमध्ये काम करणार्या कर्मचार्यांच्या चौकशा सुरू केल्या आहेत.

दरम्यान शुक्रवारी काबूल शहरावर हक्कानी गटाच्या सुमारे ६ हजार बंदुकधार्यांनी कब्जा केला आहे. या गटाचे नेतृत्व अनस हक्कानी करत असून ते हक्कानी गटाचे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यांचे भाऊ आहे. सिराजउद्दीन हे क्वेटा शहरातून संघटनेची सूत्रे हलवत आहेत.

अनस हक्कानी यांनी दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करजई व एचसीएनआरचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली होती.

करजई व अब्दुल्ला यांच्या भेटीत तालिबान नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर यांना अध्यक्षीय निवासस्थानी देशाच्या सत्तेची औपचारिक सूत्रे द्यावीत, यावर चर्चा झाली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: