तनिष्कच्या नवीन जाहिरातीवरही हिंदुत्ववाद्यांचा हल्ला

तनिष्कच्या नवीन जाहिरातीवरही हिंदुत्ववाद्यांचा हल्ला

नवी दिल्ली: तनिष्क या अलंकारांच्या ब्रॅण्डला, आंतरधर्मीय विवाहाचा संदर्भ घेऊन भाष्य करणारी एक जाहिरात, हिंदुत्ववाद्यांच्या हल्ल्यामुळे मागे घ्यावी लाग

विचारवंत आनंद तेलतुंबडे यांची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश
प्रकाशमय सणात रुपेरी पडदा अंधारातच
सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश

नवी दिल्ली: तनिष्क या अलंकारांच्या ब्रॅण्डला, आंतरधर्मीय विवाहाचा संदर्भ घेऊन भाष्य करणारी एक जाहिरात, हिंदुत्ववाद्यांच्या हल्ल्यामुळे मागे घ्यावी लागल्याचे प्रकरण ताजे असतानाच, तनिष्कच्या फटाकेमुक्त दिवाळीचा पुरस्कार करणाऱ्या नवीन जाहिरातीलाही हिंदुत्ववाद्यांनी लक्ष्य केले आहे. या विरोधापुढे मान तुकवत तनिष्कने ही जाहिरातही आपल्या सोशल मीडिया पेजेसवरून काढून टाकली आहे.

दिवाळी कशी साजरी करावी याबाबत तनिष्कने “हिंदूना सल्ले” देऊ नयेत असा पवित्रा जाहिरातीला विरोध करणाऱ्यांनी घेतला आहे.  #ThisDiwali_BoycottTanishq हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्डिंग आहे. हिंदू सुनेच्या डोहाळजेवणाची तयारी मुस्लिम कुटुंबात कशी केली जाते हे दाखवणाऱ्या जाहिरातीवर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करून ती मागे घेण्यास भाग पाडण्याचा प्रकार तनिष्कबाबत महिनाभरापूर्वीच घडलेला आहे.

ही नवीन जाहिरात फटाकेमुक्त दिवाळीला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली होती. नीना गुप्ता, अलाया फर्निचरवाला, निम्रत कौर आणि सयानी गुप्ता या चार अभिनेत्री यात दिवाळी कशी साजरी करणार याविषयी बोलताना दाखवल्या आहेत. यात सयानी गुप्ता दिवाळीत आपल्या आईला भेटण्याची इच्छा व्यक्त करते आणि त्याचवेळी फटाके मात्र कोणीच उडवू नयेत अशीही इच्छा बोलून दाखवते. त्यानंतर अलाया फर्निचरवाला, नीना गुप्ता दिवाळीत काय करणार ते सांगतात.

तनिष्कच्या उत्पादनांवर बहिष्काराचे आवाहन

या जाहिरातीमुळे संतप्त होऊन मंगळवारी ट्विटरवर #ThisDiwali_BoycottTanishq असा ट्रेण्ड जोरात सुरू झाला. हा दागिन्यांचा ब्रॅण्ड जाणूनबुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे असा आरोप अनेकांनी केला व तनिष्कच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. तनिष्कने उगाच “मूल्यशिक्षण” देण्याऐवजी जाहिरातींमध्ये आपल्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करावे असा सल्लाही काही जणांनी दिला. अर्थात काही ट्विटर यूजर्सनी या जाहिरातीत काहीच चूक नाही अशी भूमिकाही घेतली. ही जाहिरात हिंदूविरोधी म्हणणे म्हणजे अतिरेकी प्रतिक्रिया देण्याचा प्रकार आहे अशी टीका त्यांनी केली. दिवाळीत फटाके न वाजवणे हे भारताच्या भल्याचे आहे. दिवाळीत वायू प्रदूषणाचा वाढता स्तर बघता, फटाकेमुक्त दिवाळीसाठी आग्रह धरलाच पाहिजे, अशी मतेही व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, हिंदू सणांनाच का लक्ष्य केले जाते असा संतप्त प्रश्न विचारणारी एक फेक पोस्ट शायनी गुप्ताच्या नावाने प्रसिद्ध झाली. शायनीने तिच्या अधिकृत ट्विटर पेजवरून या बनावट पोस्टकडे लक्ष वेधले.

राष्ट्रीय हरीत लवादाने, प्रदूषणाच्या वाढत्या स्तराचे कारण देत, दिल्ली-राजधानी परिसरात (एनसीआर) नोव्हेंबर अखेरीपर्यंत फटाक्यांवर बंदी आणली आहे. भारतातील ज्या भागांत प्रदूषण ‘मर्यादित’ कक्षेत आहे, त्या भागांतही केवळ दोन तास पर्यावरणपूरक (ग्रीन) फटाक्यांना परवानगी आहे, असे लवादाने म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: