उत्पादन ठप्प; सप्टेंबरपर्यंत एकाच नॅनोची विक्री

उत्पादन ठप्प; सप्टेंबरपर्यंत एकाच नॅनोची विक्री

नवी दिल्ली : देशातली मोटार वाहन बनवणारी एक प्रमुख कंपनी टाटा मोटर्सने गेल्या ९ महिन्यात एकाही नॅनो कारचे उत्पादन केलेले नाही. गेल्या फेब्रुवारीत कंपनी

एअर इंडिया, भारत पेट्रोलियमची विक्री : सीतारामन
तिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला
मोदी ‘हा’ छंद बाजूला ठेवणार का?

नवी दिल्ली : देशातली मोटार वाहन बनवणारी एक प्रमुख कंपनी टाटा मोटर्सने गेल्या ९ महिन्यात एकाही नॅनो कारचे उत्पादन केलेले नाही. गेल्या फेब्रुवारीत कंपनीने केवळ एका कारची विक्री केली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यांपर्यंत एकही कार विक्रीस गेलेली नाही. पण या पार्श्वभूमीवर नॅनोचे उत्पादन बंद करण्याबाबत टाटा मोटर्सने अद्याप कोणतीही पावले उचललेली नाहीत.

मोटार वाहन संदर्भातले नवे सुरक्षा नियम व भारत ६ उत्सर्जन मानके या कसोटींवरही नॅनो बसत नसल्याने कंपनीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. कंपनीने शेअर बाजारातही सप्टेंबरपर्यंत नॅनोचे उत्पादन व विक्री झाली नसल्याची माहिती दिली आहे.

२००९मध्ये देशातील मोटार वाहन बाजारात नॅनो कार दिमाखात सामान्य माणसाची मोटार अशी बिरुदावली मिरवत दाखल झाली होती. पहिल्यांदा या मोटारीला पसंती मिळाली पण नंतर टप्प्याटप्प्याने बाजारात अन्य छोट्या मोटारी आल्याने नॅनोची बाजारपेठ घसरत गेली. उद्योगपती रतन टाटा यांच्या स्वप्नातील ही मोटार असल्याचे सांगितले जात होते आणि तिची किंमत केवळ १ लाख रुपये असल्याने सामान्य माणसाला परवडेल अशी तिची जाहिरात केली जात होती.

पण गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात कंपनीने २९७ मोटारींचे उत्पादन केले तर २९७ मोटारींची विक्री झाली. टाटा मोटर्सने नॅनोचे उत्पादन २०२० नंतर बंद होतील असे संकेत दिले आहेत.

मारुती सुझुकीकडून सलग महिने उत्पादनात कपात

देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती कंपनी मारुती सुझुकी अर्थव्यवस्थेतील मंदी पाहता आपले कारनिर्मितीचे उद्दीष्ट्य १७.४८ टक्क्यांनी कमी केले आहे.

सप्टेंबर महिन्यात कंपनीने १,३२,१९९ कारची निर्मिती केली होती तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीकडून १,६०,२१९ कारचे उत्पादन झाले होते.

कंपनीने अल्टो, न्यू वॅगनआर, सिलेरियो, इग्निस, स्विफ्ट, बालेनो व डिझायर यांचेही उत्पादन कमी केले आहे. या वर्षी सप्टेंबर अखेर हा आकडा ९८,३३७ इतका होता तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा आकडा १,१५,५७६ इतका होता. त्याच प्रकारे विटारा ब्रेजा, एर्टिगा व एस- क्रॉस या मॉडेलचे उत्पादन १७.०५ टक्क्याने कमी करून सप्टेंबर अखेर या श्रेणीतल्या एकूण कारचे उत्पादन १८,४३५ इतके होते. हाच आकडा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये २२,२२६ इतका होता.

वाहन उद्योगात आलेल्या प्रचंड मंदीचा फटका देशातील मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, हुंदेई, टोयोटो, होंडा अशा सर्व कंपन्यांना बसला असून या कंपन्यांची विक्री सरासरी १० टक्क्यांनी घसरली आहे. सणासुदीचे दिवस आले असूनही विक्री थंडावलीच आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्यात कारची विक्री ५५ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आलेली होती.

सप्टेंबर महिन्यात मारुती सुझुकीची विक्री २४.४ टक्के, महिंद्राची २१ टक्के, बजाज ऑटोची २० टक्के, अशोक लेलँडची ५५ टक्के तर टोयोटो किर्लोस्करची विक्री १७ टक्क्याने घसरली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0