भीमा-कोरेगांव प्रकरणात पुणे पोलिसांकडून हॅकिंगचे प्रयत्न

भीमा-कोरेगांव प्रकरणात पुणे पोलिसांकडून हॅकिंगचे प्रयत्न

नवी दिल्लीः भीमा-कोरेगाव, एल्गार परिषद प्रकरणात सध्या अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते रोना विल्सन व वरवरा राव आणि दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू

भीमा कोरेगाव : जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले
लोकशाहीत, जातीमागचा तो ‘कास्ट कोड’ तसाच आहे!
भीमा-कोरेगांव खटलाः तरुण महेशचा वाढदिवस तुरुंगातच!

नवी दिल्लीः भीमा-कोरेगाव, एल्गार परिषद प्रकरणात सध्या अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते रोना विल्सन व वरवरा राव आणि दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू यांची ईमेल अकाउंट पुणे पोलिसांनी हॅक केल्याचा दावा अमेरिकेतील सुरक्षा संशोधकांनी केला आहे. वायर्ड मॅगझिनने हा दावा सेंटिनेलवन या संस्थेतले सुरक्षा संशोधक जुआन आंद्रे गुरिओ सादे यांच्या हवाल्याने केला आहे.

या दाव्यामुळे एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात बनावट पुरावे उभे करण्यात राज्य पोलिस यंत्रणाच सक्रीय असल्याची ही माहिती उघड झाली आहे. वायर्ड मॅगझिननुसार पुणे पोलिसांकडून वर उल्लेख केलेल्या तीन आरोपींचे ईमेल हॅक करण्याचे प्रयत्न झाले. हे ईमेल हॅक झाल्याचे सबळ पुरावे आढळून आल्याचे जुआन सादे यांचे मत आहे.

एल्गार परिषद प्रकरणात तपास यंत्रणांकडून डिजिटल फोरेन्सिक पुराव्यात छेडछाड झाल्याचा दावा या पूर्वीही अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा संस्थांकडून झाला होता. हे दावे भारत सरकारने फेटाळले होते.

सेंटिनेलवनने केलेल्या नव्या दाव्यानुसार पुणे पोलिसांनी मॉडिफाइड एलिफंट ही हॅकिंग योजना कार्यान्वित केली होती. त्यात विल्सन यांना १००हून अधिक फिशिंग मेल पाठवण्यात आले होते. विल्सन यांच्या ईमेल अकाउंटवर २०१२ पासून हल्ले सुरू करण्यात आले होते. हे हल्ले २०१४ मध्ये तीव्र करण्यात आले होते, त्यानंतर २०१६मध्ये या हल्ल्यांची तीव्रता अधिक करण्यात आली होती, असे सेंटिनेलवनचे म्हणणे आहे.

वायर्ड मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार एका अज्ञात ईमेल सर्विस प्रोव्हायडरकडून वायर्डला काही महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीत भारतीय पोलिस यंत्रणा यांच्या कार्यप्रणालीची माहिती मिळाली. पोलिस यंत्रणांकडून विल्सन, बाबू, राव यांचे ईमेल २०१८ व २०१९ साली हॅक करण्यात आले. या तिघांचे ईमेल आयडी पुन्हा मिळवण्यासाठी लागणारा ईमेल एका पोलिस अधिकाऱ्याचा सेंटिनेलवनला आढळला. या दाव्याची पडताळणी सिटीझन लॅब या एका इंटरनेट जागल्या असणाऱ्या कंपनीने केली व त्यांनी या दाव्याची पुष्टी केली. झेशान अझिज या एका सुरक्षा संशोधकाला पोलिस अधिकाऱ्याचा रिकव्हरी इमेल आयडी व फोन नंबर मिळाला. तसेच हा फोन नंबर नोकर भरतीची साइट iimjobs.com च्या लिक डेटाबेसमध्येही मिळाला.

सिटिझन लॅबच्या स्कॉट रेलट्न या सुरक्षा संशोधकाला त्या पोलिस अधिकाऱ्याचा व्हॉट्सअपवरचा सेल्फी प्रोफाइल फोटोही दिसून आला. हा पोलिस अधिकारी एल्गार-परिषदेसंदर्भात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिसून आला. तसेच वरवरा राव यांना अटक करताना काढलेल्या छायाचित्रात तो वरवरा राव यांच्या सोबत होता असे दिसून आले.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: