तेजस्वी सूर्यां यांना जर्मनीत भारतीय संघटनांचा विरोध

तेजस्वी सूर्यां यांना जर्मनीत भारतीय संघटनांचा विरोध

नवी दिल्लीः अल्पसंख्याक समाजाविरोधात सतत गरळ ओकणारे भाजपचे दक्षिण बंगळुरु लोकसभा मतदारसंघाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे नाव पाहुण्या वक्त्यांच्या समि

नियमनाच्या अभावामुळे खाजगी रुग्णालयांद्वारे रुग्णांचे शोषण
काश्मीरात भाजप नेत्यांकडे अजूनही सरकारी निवासस्थाने
राज्यपाल कोश्यारी नमले, माफी मागितली

नवी दिल्लीः अल्पसंख्याक समाजाविरोधात सतत गरळ ओकणारे भाजपचे दक्षिण बंगळुरु लोकसभा मतदारसंघाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे नाव पाहुण्या वक्त्यांच्या समितीतून काढावे अशी मागणी जर्मनीतील भारतीय नागरिकांच्या अनेक संघटनांनी हॅम्बर्ग येथील भारतीय दुतावासाला केली आहे.

भारतीय दुतावासात स्टार्ट अप परिषद आयोजित केली असून त्यासंदर्भात भाषणे देणार्यांच्या १० वक्त्यांच्या यादीत तेजस्वी सूर्या यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. या परिषदेचा उद्देश भारत –हॅम्बर्ग यांच्यातील व्यापार संबंध प्रस्थापित करण्याचा असून दोन्ही देशांतील स्टार्ट अप व लघु उद्योग यांच्यामध्ये व्यापार व अन्य क्षेत्रात सहकार्य वाढावे यासाठी आहे.

पण या यादीत भारतातील अल्पसंख्याक समाजाविरोधात विद्वेष व मत्सराची वक्तव्ये करणार्या तेजस्वी सूर्या यांचे नाव आढळल्याने जर्मनीतील भारतीय नागरिकांच्या अनेक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या संघटनांनी एक पत्रक जारी केले असून त्या पत्रकात तेजस्वी सूर्या ही व्यक्ती अत्यंत वादग्रस्त व धर्मांध विधाने करण्यासाठी प्रसिद्ध असून त्यांची मते भारतीय वकिलातीकडून अधिकृतपणे रेटली कशी जाऊ शकतात, अशा धर्मांध व्यक्तीच्या बाजूने भारतीय वकिलात का उभी आहे, असा सवाल या संघटनांचा आहे.

तेजस्वी सूर्या यांना अशा परिषदेत सहभागी होण्याची संधी दिल्याने भारतात व भारताबाहेर राहणार्या हिंदूतेर व्यापारी गटांना युरोपियन महासंघांची द्वारे बंद होऊ शकतात, अशी भीती या संघटनांनी व्यक्त केली आहे. अशा स्टार्ट अप परिषदांमध्ये सर्वधर्मिय, वंशांच्या अनुभवी व्यक्तींना बोलावण्यात यावे. धर्मांध वक्तव्ये करणार्यांमुळे संयुक्त राष्ट्रे व युरोपियन युनियनचा तत्वांचा भंग होऊ शकतो असाही दावा पत्रकात करण्यात आला आहे. या पत्रात तेजस्वी सूर्या यांच्या अल्पसंख्याक समाजाविरोधात केलेल्या ट्विटचाही उल्लेख केला असून सीएए व एनआरसी विरोधात सूर्या यांनी केलेल्या पंक्चरवाला व अशिक्षित अशा टिप्पण्णीचीही नोंद केली आहे.

तेजस्वी सूर्या यांच्या उपस्थितीला आक्षेप घेणार्या संघटनांची नावेः  इंडिया सॉलिडिरिटी जर्मनी, सॉलिडिटरी बेल्जियम, इंडियन्स अगेंस्ट सीएए, एनआरसी अँड एनपीआर-फिनलँड, इंडियन अलायन्स पॅरिस, ग्लोबल सीख कौन्सिल, इंटरनॅशनल दलित सॉलिडिरिटी नेटवर्क, द ह्युमॅनिझम प्रोजेक्ट, फाउंडेशन द लंडन स्टोरी, भारत डेमोक्रसी वॉच व चेन्नई सॉलिडिरिटी ग्रुप.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: