तेलंगणा: दलिताच्या शेतात आख्ख्या गावाचे घाण पाणी

तेलंगणा: दलिताच्या शेतात आख्ख्या गावाचे घाण पाणी

तेलंगणातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील इडलापल्ली गावात गुर्राम लिंगैया यांचे शेत आहे. गावात सुमारे ५०० घरे असून, त्यातून येणारे सांडपाणी त्यांच्या शेताकडे वळवले जाते. नाल्याच्या मूळ प्रस्तावित आराखड्यात गावातील देवीचे मंदिर वाटेत येत असल्याने प्रशासनाने हे कृत्य केल्याचा आरोप होत आहे.

डॉ. आंबेडकरांचा फोटो काढल्याप्रकरणी कर्नाटकात विशाल मोर्चा
दलित तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड
अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ‘नेट’ आवश्यक

नवी दिल्ली: तेलंगणातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यात एका दलित शेतकऱ्याच्या शेतात त्याच्या संपूर्ण गावातील सांडपाणी बऱ्याच दिवसांपासून सोडले जात असल्याची घटना समोर आली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना अनेक निवेदने देऊनही प्रश्न सुटलेला नाही.

द हिंदूच्या वृत्तानुसार, समस्या सोडवण्याऐवजी अधिकारी म्हणतात की हे काम (ड्रेनेज) झाले आहे, ते आता बदलू शकत नाही. आता ही समस्या सोडवण्यासाठी काहीही करता येणार नाही.

मल्हारराव विभागाच्या इडलापल्ली गावातील जमीन मालक गुर्राम लिंगैया यांचा मुलगा गुर्राम अशोक यांच्या म्हणण्यानुसार, मूळ प्रस्तावित योजना ४००-५०० घरांतील सांडपाणी वाहून नेणारी मुख्य नाला जवळच्या जलकुंभाकडे वळवण्याचा उद्देश होता आणि त्याकडे जाणाऱ्या लाइनला दलित राहत असलेल्या भागातून येणारी लाइन जोडली जाणार होती.

अशोकच्या म्हणण्यानुसार, “ग्रामदेवतेच्या एका छोट्या मंदिराचा हवाला देऊन पाईपलाईन वाटेत वळवण्यात आली. वास्तवीक ड्रेनेज वाहिनी मंदिराच्या बाजूने जाणार होती आणि त्याचा मंदिराला स्पर्शही होणार नव्हता. आमचे ड्रेनेजचे पाणी मुख्य लाईनमध्ये जाऊ नये, असे त्यांना वाटत होते, म्हणून त्यांनी सगळे पाणी वाहून नेणारा नाला आमच्या वस्तीकडे आणि आमच्या शेताकडे वळवला.”

लिंगय्या यांनी नाल्याच्या बांधकामादरम्यान त्यांच्या एक एकर जमिनीवर विपरित परिणाम होणार असल्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या, तरीही त्यांची दखल गांभीर्याने घेतली गेली नाही.

अशोक यांनी यासाठी गावच्या सरपंचाला जबाबदार धरत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने जाणीवपूर्वक भेदभाव करण्यात आल्याचे म्हटले आहे. सरपंच स्वतः दलित आहे, मात्र प्रतिस्पर्धी पोट-जातीतील आहे.

या समस्येचा परिणाम लिंगय्या यांच्या शेतजमिनीवरच होत नाही, तर त्यांच्या जमिनीलगत असलेल्या इतर शेतजमिनीवरही होत आहे. त्यापैकी बहुतांश अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय शेतकरी आहेत. लिंगय्या यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी (स्थानिक संस्था) यांनाही याबाबत माहिती दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

दुसरीकडे, शेताला भेट देणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी टी.एस. दिवाकर म्हणाले, की सांडपाण्यासाठी नैसर्गिक उतार हा लिंगय्या यांच्या प्लॉटकडे असल्याने ते तेथे हलविण्यात आले.

त्यामागे कोणताही द्वेष किंवा भेदभावाचा हेतू नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु नाला पुन्हा वळवण्यास मोठा खर्च येईल असेही त्यांनी नमूद केले.

द हिंदूच्या वृत्तानुसार, दिवाकर म्हणाले, “मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घाणेरडे पाणी त्यांच्या शेतात पोहोचण्यापूर्वीच वळवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु दुर्गंधीमुळे ते त्यासाठी तयार नाहीत.”

मात्र अशोक म्हणतात, की, गावाच्या आजूबाजूला आठ पाणवठ्यांवर सांडपाणी वाहून जाण्यासाठी आठ नैसर्गिक उतार आहेत, त्यापैकी एकही त्याच्या जमिनीच्या जवळ नाही, जिथे सांडपाणी वळवले गेले आहे.

अशोक म्हणतात, “आमचा विरोध असूनही नाला वळवला गेला. गावातील सांडपाणी खाजगी जमिनीत सोडण्याची योजना ते कसे करू शकतात?”

(छायाचित्र – प्रतीकात्मक)

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0